सन १७६७ ला राणी अहिल्यादेवी होळकर यांचे पुत्र श्रीमंत सुभेदार मालेराव होळकर यांचा मृत्यू झाल्यानंतर होळकरशाहीचे नवे सुभेदार कोण हा प्रश्न उपस्थित राहिला? बहुतेक जणांना असे वाटले कि अहिल्यादेवींचे नाथू नथोबा फणसे यांना दत्तक घेतले जाईल मात्र सुभेदार झाले तुकोजीराव होळकर(पहिले).
सुभेदार तुकोजीराव होळकर यांच्या शिक्का बनवला गेला व त्यावर उल्लेख होता, “श्री मार्तंड चरणी तत्पर मल्हारजी सूत तुकोजी होळकर निरंतर”, याचा मराठी अर्थ असा आहे कि, मार्तंड(खंडोबा) देवाची सेवा करण्यासाठी मल्हारीचा मुलगा तुकोजी स्मरथ आहे.
यांवरून अनेकांना प्रश्न पडला कि, सन १७६६ ला सुभेदार मल्हारराव होळकर(पहिले) यांचा मृत्यू झाला होता व त्यावेळेस त्यांच्या पत्नी बाणाबाई व द्वारकाबाई सती गेल्या होत्या व मल्हाररावांची पहिली पत्नी श्रीमंत गौतमाबाई होळकर तर सन १७६१ ला अदोगरच मृत्यू पावल्या होत्या मंग तुकोजीरावांना दत्तक कोणी घेतले?
इतिहासात एक गैरसमज आहे कि, अहिल्यादेवींनी तुकोजीरावांना दत्तक घेतले होते आणि तसं जर असत तर त्यांच्या शिक्क्यावर मल्हाररावांच्या नावाऐवजी अहिल्यादेवींचे पती खंडेरावचं नाव आलं असत मात्र तसे नाही याचे एकच कारण आहे ते म्हणजे श्रीमंत हरकूबाई(मावशीबाई) होळकर.
सुभेदार मल्हारराव होळकर यांची पहिली पत्नी गोतमाबाई होळकर यांचा अदोगरच मृत्यू झाला होता व मल्हाररावानं बरोबर त्यांच्या दोन पत्नी सती गेल्या होत्या मात्र चोथी पत्नी हरकूबाई या सती गेल्या नाही.
त्यांना खंडाराणीचा दर्जा असून सुध्या त्या का सती गेल्या नाहीत याचे तत्कालीन पुरावे मात्र अजूनही भेटत नाहीत. सन १७६७ ला मालेरावांच्या मृत्यूनंतर अहिल्यादेवींच्या परवानगीने हरकूबाई होळकर यांनी तुकोजीरावांना दत्तक घेतले व ते होळकरशीचे सुभेदार झाले. सन १७९५ पर्यंत तुकोजीराव सुभेदार असताना अहिल्यादेवींनी रिजंट महाराणीच्या स्वरूपात होळकरशाहीचा कारभार पहिला.
श्रीमंत हरकुंवर बाईसाहेब या बढवाणीच्या रजपूत राजाच्या कन्या होय. सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या तलवारी सोबत हरकुंवर यांचे लग्न झाल्याने त्यांस खांडाराणीचा मान प्राप्त होता. सुभेदार मल्हारराव होळकर यांना हरकुवरबाईपासून भारमलदादा नावाचा पुत्र झाला.
स्वतः हरकूबाई या नेहमी सुभेदारासोबत युद्ध मोहिमावर जात असत. शिवाय त्या सून अहिल्याबाई च्या दैनंदिन देवपुजा कार्यात भारमलदादासह मोलाची मदत करीत असत. सुभेदार मल्हाररावांनी गौतमीबाई यांच्या नावे जेव्हा खाजगी जहागिरी मंजूर केली तेव्हा त्यांनी काही काळानंतर आपल्या उर्वरित तीन बायकांच्या नावेही काही जहागिरी मंजूर केली होती.
हरकुंवर मावशी यांच्या कडे खानदेशातील वाघाडी, अहिल्यापुर, नांदणी, सांगवीच्या पाटीलकीचे वतन व मध्यप्रदेशात खरगोण शहर होते. खरगोण शहारामध्ये त्यांचा प्रसिद्ध वाडा हि होता जो मावशी बाईंचा वाडा या नावाने ओळखला जायचा.
सुभेदारांच्या हयातीत हरकुमावशी या इंदुर ला राहत असे पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी होळकर राजगादीचा कारभार सुरू केल्यानंतर हरकुमावशी महेश्वर येथे राहायला आल्या त्यांना मुक्ताबाई च्या वाड्याशेजारी एक वाडा होता जो महेश्वर किल्ल्याला खेटून आहे वाडा व किल्ल्यात जायला अंतर्गत वाट होती. महेश्वरच्या जगप्रसिद्ध घाटाची छोटी प्रतिकृती म्हणजेच मुक्ताबाई चा वाडा होय.
तसेच हरकूबाई व मुलगा भारमलदादा यांनी होळकर शासकांना व कुटुंबातील सुभेदार तुकोजीराव(१), महाराजा यशवंतराव(१) यांच्या कारकिर्दीत मोलाची मदत केली. त्यांना सर्वजण ‘मावशीबाई’ म्हणत.
होळकर दौलतीविषयी सर्वजण त्यांच्याशी सल्ला मसलत करीत असत. शिवाय त्या सर्वाशी मोठया सहकार्याने व प्रेमाने वागत असत. महाराजा यशवंतराव होळकर यांच्या राज्यभिषेखावेळी त्या उपस्थित असून त्यांच सर्वप्रथम ओक्षण हे हरकूबाई यांनी केले होते.
हरकुमावशी ह्या गुप्त खबरा काढण्यात आणि माणसे ओळखण्यात तरबेज होत्या. हरकूबाई आणि अहिल्यादेवी यांच्यायामध्ये फक्त चार वर्षचे अंतर होते. पण त्या नात्याने जरी अहिल्यादेवींच्या सासु असल्या तरी त्या शेवटपर्यंत आई मुलीसारख्या राहिल्या.
सन १७६७ मध्ये राघोबादादाने महेश्वर वर चाल करून येण्याची योजना आखली होती अहिल्यादेवी यांचा विश्वासू शिवाजी गोपाळ, नंणद उदाबाईसाहेब वाघमारे व हरकुमावशी यांनी ती योजना ओळखून अहिल्यादेवीस सावध केले होते.
बढवाणीच्या राजपूत घराण्यातुन होळकर राजघराण्यांच्या सुनबाई असलेल्या हरकुंवर यांचा पुढे महानुभव पंथाशी संबंध आला. हरकुमावशी यांनीही आपल्या खाजगीतुन अनेक मंदिराच्या जीर्णोध्दारासह बारवांची निर्मिती केली आहे.
इंदोरच्या होळकर राजवाड्याच्या बाजूला असलेले बांकेबिहारी मंदिर त्यांनीच निर्माण केले आहे. जळगावमधील नांदणी गावात त्यांनी बारव बांधली आहे असून चांदवडच्या रेणुकामंदिराच्या छताला त्यांचा शिलालेख आहे.
हरकुमावशी यांचा मृत्यू कधी व कोठे झाला हे अजूनही समजले नसून हरकुमावशी यांचे बाबत होळकर रियासतीत जुजबी माहिती आहे मात्र त्यांचा पत्रव्यवहार अज्ञात असुन संशोधनानंतर त्यांच्या वेगवेळ्या पैलुवर प्रकाश पडेल.
मात्र त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा होळकर संस्थानाच्या शासकांना प्रशासनात झाला हे नक्की. इतिहास अभ्यासक रामभाऊ लांडे यांनी हरकुंवर यांची मोहर शोधली असून, ती खालीलप्रमाणे होती,