Skip to content

Ahilyabai Holkar Shayari & Quotes


ना सत्तेसाठी, ना राजकारणासाठी,
ना स्वार्थासाठी, ना प्रसिद्धीसाठी,
जीव फक्त तडपतो अस्मितेसाठी,
मी मी म्हणणारे त्यांना मातीत
लोळवणारी महाराष्ट्राची माती हाय,
खंजीरही घुसणार नाय
अशी या धनगराची छाती हाय.
Unknown Writer


अहिल्यादेवींचे वंशज आम्ही
कमजोर आम्हाला समजू नका,
चिंध्या चिंध्या करून टाकू
नाद आमचा करू नका.
Unknown Writer


लावतो जेव्हा पिवळा टिळा माथ्यावर,
घेतो जेव्हा पिवळा खांद्यावर,
गर्व वाटतो आम्हाला
जय अहिल्या म्हटल्यावर,
त्यावेळी दुश्मनही म्हणतो
काय शान असते ना,
धनगर असल्यावर.
Unknown Writer



धनगर आमची जात,
धनगरी अमुचा थाट,
आमुच्या मागे पोर साठा,
एका एकाची भल्याभल्यावर मात,
नाद कराल तर पाडू दात,
नाही तर करू भुईसपाट,
एकच आमचा नारा,
जय अहिल्या जय मल्हार.
Unknown Writer


धक्का देणे शक्य नाही,
कोणा अहिल्यादेवींच्या ख्यातीला,
धनगरांशिवाय पर्याय नाही,
महाराष्ट्राच्या मातीला.
Unknown Writer



उरी बाळगूनी स्वप्न मराठी सत्तेचे,
बांधुनी तोरण हजारो गड किल्ले, मंदिरांचे,
घडविले जिने नव्या हिंदोस्तानाला,
एकच होती ती राणी अहिल्यादेवी होळकर.
Unknown Writer


राण्या असंख्य झाल्या या जगात,
पण पुण्यश्लोक कोणीही नाही,
गर्व जिचा आहे या मराठी ह्दयाला,
एकच ती महाराणी
अहिल्यादेवी होळकरचं झाली.
Unknown Writer



दुःखामध्ये डोळ्यातून धार आणू नका,
संकुचित जगण्याला सार मानू नका,
जिवनाला कधी भार मानू नका,
अहिल्यादेवींची शपथ कधी हि
हार मानू नका,
मुर्खांच्या संगतीला राहाल
तर माती व्हाल,
अहिल्यादेवींच्या विचारांनी जगाला
तर पुण्यश्लोक व्हाल.
Unknown Writer


पुरे झाले आता आमच्यावरती हल्ले,
बुरुजा सकट जागे करू
महाराष्ट्रातील किल्ले,
पाठीवर आमच्या राणी अहिल्येचा हात हाय,
मोडेल पण वाकणार नाय ही,
धनगराची जात हाय.
Unknown Writer



राणी आमुची अहिल्या,
जात आमुची धनगर,
कराल आमुचा घात,
तर पाठीत घालू लाथ,
ध्यानात ठेवा सर्वांनी,
हाय तुमची धनगरांशी गाठ,
गर्व आहे मला मी धनगर असल्याचा.
Unknown Writer


जर कोणी चुकत असेल
तर त्याला सत्याची वाट दाखवा,
अन जर कोणी नडत असेल
तर त्याला धनगराची जात दाखवा.
Unknown Writer


आकाशात पिवळ्याची जेव्हा किनार दाटली,
शत्रूलाहि तेव्हा धनगर
नसल्याची लाज वाटली.
Unknown Writer


कर्म धनगर, श्वास धनगर,
जात धनगर, बात धनगर,
आस धनगर, ध्यास धनगर,
मी धनगर, आम्ही धनगर,
जय धनगर, जयस्तो धनगर,
धनगर, धनगर आणि फक्त धनगर.
Unknown Writer


जय मल्हारची पुन्हा वादळी हाक पाहिजे,
वीर मर्द धनगरांचा थवा पाहिजे,
पुन्हा एकदा या विश्वाला इंदोरची राणी
अहिल्यादेवी होळकर पाहिजे.
Unknown Writer


भारत के समुच सात इतिहास में,
मैं स्त्री अहिल्यादेवी होलकर
का स्थान अद्वितीय मानता हुं।
– आचार्य विनोबा भावे


अन्य मराठी कविता वाचण्यासाठी नक्की भेट द्या mazablog.online