तुकोजीराव होळकरांचा जन्म इ.स. १७२५ चा आहे. अहिल्याबाई होळकरांचाही जन्म त्याच वेळचा म्हणजे इ.स. १७२५ चा. तुकोजीराव मल्हारराव होळकर यांच्या बरोबर मोहिमेत असायचे. सन १७६९ पासून पाच वर्षे ते महादजी शिंद्या बरोबर दिल्लीकठे असून सन १७७४ मध्ये दक्षिणेत आले. ते सन १७७८ पर्यत इकडेच पेशव्याच्या मोहिमांवर होते. फक्त १७८० मधे गुजराथ मोहिभेनंतर पावसाळयात काही महीने इंदुरास होते.
परिचय :
- जन्म : २६ जून १७२३
- जन्म ठिकाण : –
- कार्यकाळ : १७९५ – १७९७
- मृत्यू : १५ ऑगस्ट १७९७
- मृत्यू ठिकण : खडकी(पुणे), जि.पुणे(महाराष्ट्र)
- संस्थान राजधानी : किल्ले महेश्वर
- पत्नी : रत्नाबाई होळकर
- मुलगा : काशीराव, मल्हारराव, विठोजीराव व महाराजा
यशवंतराव होळकर - उपाधी : सुभेदार
- वडील : तानुजी होळकर
सन १७८७ मधे उत्तरेस गेल्यानंतर एकदम खर्ड्याच्या स्वारीच्या प्रसंगी दक्षिणेत बोलावल्यावरुन सन १७९४ मध्ये तुकोजीराव होळकर पुण्यात आले, आणि तेथेच दि. १५/०८/१७९७ रोजी मृत्यू पावले. ही सुभेदार तुकोजीराव होळकर यांची अगदी थोडक्यात माहिती आहे.
सरकारी कागदात तुकोजीराव होळकरांचा पहिला उल्लेख सन 1750 त येतो. म्हणजे नानासाहेब पेशव्यांच्या कारकिर्दीचे प्रारंभासच ते पुढे येतात. मल्हारराव हे सुभेदार झाले होते. त्यांच्या हाताखाली तुकोजीराव वाढत होते आणि सन 1750 च्या सुमारास त्यांच्या हातुन काही भरीव कामगिरी घडली असणार. सन १७६० मध्ये अहभदनगर जिल्हयात कोळयांनी मोठी बंडाळी देली होती. चिता बिमोड तुकोजीरावांनी मोठया शिताफीने केल्याचा उल्लेख त्या जिल्हयाचा Gazette मध्ये केलेला आहे.
- अहिल्यादेवींच्या काळातील बारवांची माहिती
- अहिल्यादेवींच्या काळातील मंदिरांची माहिती
- अहिल्यादेवींच्या काळातील ऐतिहासिक वास्तू
सुभेदार तुकोजीराव होळकरांचा समग्र इतिहास जाणून घ्याचा असेल तर
आजच त्यांच्या जीवनावरील ससंदर्भ असलेले पुस्तक मागून घ्या.
तुकोजीराव होळकरांचा उल्लेख मल्हारराव होळकरांसोबत राजपुताण्याच्या स्वारीत आढळतो. तत्पूर्वी भवानी शंकर बक्षीच्या रोजनिशीत ही तुकोजीराव बददलचा गोषवारा दिला आहे. मल्हारराव बडे साहेबांकडे अधिकारी झाल्यावर त्यांनी आसमंतातून आणखी लोकांची जमवाजमव केली. नंतर तो मौजे बाफगावी तुकोजीराव होळकर रहात होता त्याजवळ गेला. तुकोजीराव होळकर हा ही दहा स्वार आपले बरोबर घेऊन त्याज जवळ कामास राहिला. तो मौजे पूर(पोर) गावी गेला तेव्हा संताजी होळकर व रोडाजी होळकर (तुकोजीरावांचे बंधू) हे ही मग त्यांच्या जवळ कामा निमित्त येऊन राहिले.
जयपूर वाल्याचे पाऊल मागे पडताच मल्हारजी बुंदी कोटेबाले यास भेटून ‘खातरतसलीम करून इंदुरला परत आले, आणि पाच हजार फौज सोबत देऊन तुकोणीराव होळकरांना माळव्याच्या बंदोबस्ताकरिता पाठंविले. तुकोजी होळकर फौजसुध्दा मेवाडात गेले. अलीकडे मंदसोरात वस्ती फार करुन मेवाल्यांची व कोतवालाशी कलह होऊन मेवाल्यानी चढाई करुन कोतवाल यांचे डोके गादीवर कापले. हे वर्तमान थाळनेर मुक्कामी समजताच सुभेदार हजार स्वारानिशी धाऊन तिसरे दिवशी मंदोसरास आले. तेव्हा मेवाली सुभेदारास शरण येऊन पन्नास हजार रुपये नजर दिले.
दुहेरी राज्यव्यवस्था :
सुभेदार मल्हारराव होळकरांच्या मृत्युनंतर सर्व राज्यकारभार स्वत: अहिल्याबाई जातीने करित होत्या. लष्करी कामगिरीवर मात्र तुकोजींराव होळकर बजावत असत म्हणजेच होळकरांच्या घरात मालेरावांच्या मृत्युनंतर दुहेरी राज्यव्यवस्था स्थापन झाली. अहिल्यादेवींच्या मृत्युनंतर मात्र तुकोजीराव होळकर हे दौलतीचे पूर्ण मालक झाले, आणि होळकरांच्या दौलतीचा संपूर्ण कारभार त्यांच्या वंशात शेवटपर्यत चालला. सुभेदार तुकोजीराव होळकर स्वत: अहिल्यादेवींच्या मर्जीने वागून त्यांच्या आज्ञेत्त राहत असतं. राणी अहिल्यादेवींच्या मर्जीविरुध्द तुकोजीराव होळकर सहसा कधीही गेले नाहीत.
तुकोजीराव होळकरांचा राज्यकारभार :
सुभेदार मालेराव होळकरांच्या मृत्युनंतर अहिल्याबाईना दुसरा पुत्र नसल्याने होळकरशाहीचा कारभार कोणाला सोपवावा हा प्रश्न होता. पण सुभेदार मल्हाररावांनी मृत्युपुर्वीच मालेरावांचा हात तुकोंजीच्या हातात दिला होता. शिवाय हयावेळी होळकरांच्या घरात तुकोजीराव यांच्या शिवाय एकही कर्ता पुरुष नव्हता. शेवटी अहिल्याबाई व कारभारांच्या विचारअंती मुख्य कारभार अहिल्याबाईच्या अखत्यारीतच राहावा व बाहेरचा म्हणजे युद्ध मोहिमेचा सर्वभाग म्हणजेच सरदारकी तुकोजींना सोपवावी असे ठरले. फारसा घोळ न पडता सुभेदारांची वस्त्रे तुकोजीराव होळकर यांना मिळाली आणि पुढील कामगिरी ओघानेच यांच्याकडे आली. अशाप्रकारे होळकरशाहीत दुहेरी राज्यव्यवस्था सुरु झाली.
तुकोजींची उत्तरेकडील कामगिरी(१७६९-७२) :
१० जुन १७६८ ला पेशवे माधवरावांनी घोडप येथे रघुनाथरावांचा पराभव करुन त्यांना पुण्यात नजर कैदेत ठेवले. जानोजी भोसल्यांचा पराभव होऊन १७६९ च्या कानकपूरच्या तहाने जानोजीराव भोसले यांच्या वर पेशव्यांनी जबर बसवून वेळप्रसंगी पेशव्यांना मदत करण्याचे वचन मिळविले. निजाम मित्र बनला होता. हैदरखान वर ही जवळपास नियंत्रण प्रस्थापित करण्यात माधवराव यशस्वी झाले होते. इ.स. १७६९ पर्यंत पेशवे माधवरावांची दक्षिणेच्या कटकटीतून बरीच सुटका झाली होती.
श्रीमंत माधवराव पेशव्यांचे स्वप्न दक्षिणेपूरतेच मर्यादित नव्हते तर उत्तरेतही मराठयांचा प्रभावं पूर्ववत प्रस्थापित करण्याचा होता. आणि म्हणुन पेशवे माधवरावांनी दक्षिण कामगिरी स्वतः स्वीकारुन उत्तरेच्या कामगिरीवर रामचंद्र गणेश कानडे आणि विसाजी कृष्ण बिनीवाले यांच्या नेतृत्वात इ.स. १७६९ च्या एप्रिल महिण्यात एक मोठी सेना रवाना केली. त्यांच्या मदतीला तुकोजीराव होळकर आणि महादजी शिंदे उत्तरेस रवाना होतात. तत्पूर्वी २८ सप्टें. १७६७ रोजी सखाराम बापू तुकोजीराव होळकरास लिहितात “महादजी शिंदे यास घेऊन लांब लांब मजला करीत यावे”( ६ मे १७६८). महादजी शिंदे तुकोजीस लिहितात “आपण व आम्ही समागमेच हिंदुस्थानात जाऊ”.
पानीपतनंतर काही काळ मराठे व अब्दाली दोघेही दिल्लीच्या राजकाराणातून निवृत्त होताच जाट, रोहिले व वजीर सुजाउद्योला यांनी या संधीचा फायदा करुन घेवून दिल्लीच्या राजकारणातून मराठयांचे कायम उच्चाटण करुन आपले वर्चस्व स्थापण्याचा प्रयत्न सुरु केला. यावेळी बादशाहा शहाआलम अलिगोहर हा ब्रिटिशांचा अंमलाखाली अलाहाबाद येथे असहाय्य आणि असंतुष्ट होता. मराठयांनी सरळ दिल्लीपर्यंत चाल करुन राजधानी ताब्यात घ्यावी असा आदेश माधवराव पेशव्यांचा विसाजी कृष्ण बिनीवाले हयांना दिला होता.
रामचंद्र गणेश कानडे आणि विद्याजी कृष्ण बिनीवाले हया दोघामध्ये माळव्यात लष्कर आल्यापासून चुरस वाढत चालली होती. प्रत्येक गोष्टीत यांची हमरीतुमरी चाले. उत्तरेत आल्यावर रामचंद्र गणेश कानडे व होळकर, शिंदे या तिघांनी तीन कार्यक्रम वाटून घेतले. कानडे बुदेलखंडाकडे वळले, होळकर बुंदी कोट्याकडे व शिंदे उदयपूरकडे. आपआपल्यापरी खंडणी वसुलाकडे ही मंडळी गुंतली होती. उत्तरेत मराठी फौजा पोहोचताच जाट राजा नवलसिंगनी याला विरोध करण्यास सुरुवात केली.
यावेळी तुकोजीराव व महादजीत मतभेद निर्माण झाले. (१४/०५/१७६९) त्रिबंक शिवदेव लिहितो, “शिंदे होळकर उदयपूराकडे आहेत. उभयतांचे चित्त शुध्द नाही”. महादजीने राणारतन सिंहाचा पक्ष घेतला. तुकोजीराव यांनी राणा आरसीकडुन खंडणी सोंडे चौसष्ट लक्ष करार केली. रतनसिंहास सव्वालक्षाचा वाटा द्यावा व महादजीस पाच लक्षाचा घाटा द्यावा याप्रमाणे करार केला. होळकरांचा सरदार खंडूजी अरगडे लिहितो(०४/१२/१७६९), “बुंदीकोटयाचे प्रकरण बारा लक्षपर्मत चुकणार आहे”. पुढे जाटाचे मुलुखात जाऊ. जाटाचे पारपत्य केल्यास माधवसिंग पन्नास लाख ब बादशहा पन्नास लाख देण्यास तयार आहे.
जाटाने आमचे तोंडावर विस हजार फौज पाठविली आहे. जाटाचे पारिपत्य करण्यास इ.स. १७६९ च्या अखेरीस सर्च फौजा निरनिराळया कामगि-या आटपून चंबळवर एकत्र होऊन जाटाचे मुलुखात शिरल्या. दि. ५ एप्रिल १७७० रोजी गोवर्धन येथे जाट आणि मराठे हयांच्यात झालेल्या लढाईत जाटांचा निर्णायक पराभव झाला. त्यांची संपूर्ण फौज लुटल्या गेली. नवलसिंगाकडे मिस्टर सुमरु व फेंच जनरल मांडेल हे युरोपियन अंमलदार होते. हयांचा सुभेदार तुकोजीरावांनी पराभव केला. जाटाचे खंडणीचा करार पासष्ट लाख दरबार खर्च मिळून झाला आहे. परंतु सरकारातून मामलत झाल्यामुळे होळकर आजुदे आहेत. शिंदे यांचे मत मामलत करावयाचे आहे. नबलसिंग जाटाच्या पराभवामुळे मराठयांच्या मार्गातील एक महत्वाचा काटा नाहिसा झाला. त्यानंतर लगेचच मराठयांनी आग्रा आणि मथुरा ही ठिकाणेही हस्तगत केली.
मराठयांच्या उत्तरेतील आगमनामुळे नजीबखान घाबरला. पानिपतच्या पराभवाचा मराठे बदला घेतील या भीतीपोटी त्याने तुकोजीराव होळकर यांच्या मार्फत मराठयांशी मैत्री केली. नजीबचा होईल तितका उपयोग करुने नंतर पारिपत्य करावे असे तुकोजीराव व विसाजीचे मत होते तर नजीबचे पूर्णपणे पारिपत्य करावे असे महादजी व रामचंद्र गणेशाचे मत होते. शेवटी पेशव्यांचे विचारे ठरले की नजीबशी कायमची दोस्ती करु नये. दिल्लीच्या मसलतीत त्याचा शक्य तितका उपयोग करुन घ्यावा आणि मागाहुन त्यास जेर करावे. एप्रिल १७७० मध्ये मराठे यमुना ओलांडून अहमदखान बंगशाच्या प्रदेशात शिरले. ह्यावेळी सुध्दा नजीबखान अहमदखान बंगश हयांचेशी संघान साधुन मराठयांचा पात करण्याच्या गुप्त कारावाया करीतच होता.
परंतु हयावेळी मराठे पूर्वानुभवाने सावध झाले होते. चारही बाजुंनी पठाणांचा वेढा पडण्याची शक्यता दिसताच मराठे य॒मुनपर्यंत परत आले. दि. ३१ ऑक्टोंबर १७७० रोजी नजीबखानाचा मृत्यु झाला. त्याचा मुलगा झबेताखान हा पित्याची संपत्ती आणि सत्ता हयांचा वारस झाला. झबेताखानाने बादशहा शहाआलम कडुन मीरबक्षीचे पद जबरीने मिळवून घेतले. आणि हया अधिकाराच्या बळावर दोआबात त्याने मराठयावर चाल केली. मराठयांनी पूर्ण सहकार्याने बंगश आणि रोहिल्याविरुध्द लष्करी कारवाई केली. इटावा हस्तगत करून दि. १५ डिसेंबर १७७० रोजी त्यांनी फरुकाबाद ताब्यात घेतले. मराठयांना तोंड देणे अशक्य होऊन अहमदखान बंगशाने प्राणाची भीक मागत पानिपत युध्दापूर्वीचा मराठयांच्या ताब्यात असलेला दोआबातील सर्व प्रदेश परत त्यांना दिला.
हया् मुळे दोआबात मराठयांची सत्ता आणि प्रतिष्ठा प्रस्तापित झाली. याप्रमाणे जाट, रोहिले नामोहरण झाले. नजीबउद्योला व बंगश मृत्यु पावले. इंग्रज कंपनी सरकार तटस्थ राहिले आणि मराठयासमोर उभे राहण्यास कोणीही राहिला नाही.
मराठयांच्या मदतीने बादशहा दिल्ली तख्तावर – ६ जानेवारी १७७२
जाट आणि रोहिले हे मराठयांचे प्रमख दोन शत्रु हयांच्या सत्तेला पायबंद बसला आणि त्याचबरोबर बादशहाला दिल्लीत परत आणून दिल्लीवर ताबा मिळविण्याकरिता मराठयांचा मार्ग मोकळा झाला. नजीबखानाच्या निधनानंतर मिर्झा नजफखान हा दिल्लीच्या कारभारात प्रमुख झाला. मराठयांच्या नेतृत्वात ब्रिटिशाविरुध्द उत्तरेच्या सत्ताधिशांची युती होऊ न देण्याचा प्रयत्न ब्रिटिशांचा होता. तशी युती बादशहा भोवतीच केंद्रित होऊ शकेल हयांची जाणीव असल्यामूळे अलाहाबाद येथे बादशहा आलम हयाला इंग्रजांनी आपल्या नियंत्रात ठेवले होते.
इंग्रजांच्या भरवश्यावर दिल्लीत जाळून आसन स्थिर करण्यात अर्थ नसल्याची कल्पना बादशहाला आली. शिवाय बादशहाची मातोश्री झीनतमहलने ही गारद्यांचा आधार घेण्याचा सल्ला दिला. तेव्हा मराठयांच्या दोआबात तळ असतांना वजीर शुजाउद्योला याने रामचंद्र गणेश कानडेची भेट घेतली. मिर्झा नजफखानालाही मराठयांची भेट घेण्करिता पाठविले. परंतु मराठयांच्या अटीबददल बादशहा घासाघीस करु लागला. शेवटी मराठयांनी दुस-या कोणाला तरी तख्तावर स्थापण्याचा धाक घालताच मात्र बादशहा अनुकूल झाला.
इ.स. १७७१ च्या प्रारंभी झाब्रेतारवाना कडून दिल्ली हस्तगत करण्यास मराठा सैन्य पुढे सरसावले आणि १० फेब्रुवारी १७७१ रोजी दिल्ली काबिज केली. बादशहाचा मुलगा जवानबख्त हयाला तख्तावर बसबुन शिंदेनी नजराणा पेश केला, हे पाहताच दि.१२ फेबुवारी १७७१ रोजी दिल्लीला जाण्याकरिता बादशहाने अलाहाबाद सोडले. ६ जानेवारी १७७२ रोजी बादशहा शहाआलम दिल्लीला येऊन पोहचला. बादशहा शहाआलमला दिल्लीच्या तख्तावर बसविण्याचे महत्वांचे कार्य इ.स. १७७२ मध्ये मराठयांनी महादजी शिंदे यांच्या पुढाकाराने साध्य केले.
तुकोजराव होळकर आणि रोहिले फत्तरगड मोहीम :
मराठयांच्या सहकार्याने बादशहा दिल्लीच्या तख्तावर बसल्यामुळे साहजिकच मराठयांची प्रतिष्ठा, दरारा एकदम वाढला होता. तथापि आपला दबाव कायम असावा असे उत्तरेकडील सरदारांना वाटणे साहजिकच होते. रोहिले एकदम स्तब्ध झाले नव्हते. मराठया विरुध्द कारवाई करणारा एक शत्रु उरला होता तो म्हणजे झबेताखाना. बादशहाच्या मिरबक्षीबददल होळकर आणि शिंद्यात मतभेद झाल्याने मराठी सरदारात दोन पक्ष दिसु लागले. मोगल फौजेस बादशहाने मराठयावर हल्ला करण्यास उत्तेजन दिले. होळकर व बिनीवाले हयांच्या ‘फौजावर बादशाही पंधरा हजार फौज चालुन गेली.
तुकोजीराव होळकरांनी त्यांचा पराभव केल्याने डिसेंबर १७७२ मध्ये बादशहाला होळकरांशी तह करावा लागला. होळकर व शिंदे यांचे वैमनष्य वाढून शिंदे पंचवीस कोस मागे गेले, पण पांडुरंग रणसोड पारनेकर व दिवाण फडणिसांना पाठवून शिंदेना व कानडेना समजावून आणले, यानंतर मात्र त्रिवर्गसरदार एकत्र होवून झाबेताखान रोहिला यांच्या राजकाराणास लागले. सन १७७२ फेब्रुवारीमध्ये मराठे झाबेताखानावर चालुन गेले. शिंद्याचे लोकांचा मारा अजब ठरला. मराठी सेन्याने रोहिल खंडातील त्यांचा सर्व प्रदेश आपल्या ताब्यात घेतला. झाबेताखान अंधाराचा फायदा घेवून पळून गेला. पथरागडापर्यंत मराठयांनी त्याचा पाठलाग केला.
दुस-या दिवशी सुभेदार तुकोजीराव स्वतः जातीनिशी गंगापार उतरले. तिसरे दिवशी गाठ घालून लढाई मातब्बर झाली. बक्षीचे डोके कापून आणुन फौज बरबाद केली. शिंदे रामचंद्र गणेशांनी कुमक केली नाही. बक्षी मारल्याचे समजताच झाबेताखान साठ हजार फौज व तिनशे तोफा घेऊन तुकोजींच्या मुकाबल्यास आला. दुतर्फा शह पाडून रोहिले कुल बरबाद झाले. हे वर्तमान शिंदे व रामचंद्र गणेशा यास समजताच कुच करुन सुभेदारास सामील झाले.
त्रिवर्ग एक होऊन पथरागडास मोर्चे लावून त्यांनी किल्ल्यावर हल्ला केला. हे ठाणे एप्रिल १७७२ मध्ये घेतले. येथेच झाबेताखानाची कुटूंबीय मंडळी त्यांच्या हाती लागली. झाबेताखान मात्र उत्तरेच्या जंगलात पळून गेला. सुभेदार तुकोजीराव व नवलसिंग यांची लढाई भरतपूर व डींग यामध्ये होऊन जाटांचा पूर्ण पराभव झाला. या युध्दात स्वता तुकोजीराव हजर होते. लढाई होळकरांनी मारली. हया ठिकाणी तुकोजींना प्रचंड लुट मिळाली. पानिपतापासून हत्ती, घोडे, तोफा आणि इतर अनेक मौल्यवान वस्तुंची रोहिल्यांनी आणलेली लुट मराठयांनी परत मिळविली. तिन्ही लष्कराची लूट एक करून तुकोजीरावांनी बरहुकुम हिस्सा वाटुन दिला.
हयानंतर फौजा माघारी फिरुन जाटांपासून खंडणी वसूल करुन सुभेदार तुकोजीराव होळकर इंदुरास परतले. या स्वरीस फत्तरगढची स्वारी म्हणतात. मराठयांच्या साहयाने दिल्लीच्या तख्तावर बादशहा शहा आलम स्थानापन्न झाला आणि दिल्लीचा मराठयांनी ताबा घेतला. हे यश मराठयांची मान अभिमानाने ताठ व्हावी असेच होते. या यशाने मराठयांनी पानिपतावरील कलंक धुवूल महापराकृमी म्हणुन मराठयाचे स्थान सिध्द केले.
शिवाजी महाराजांच्या ‘हिंदवी स्वराज्याच्या’ महान आकांक्षेतल एक प्रमख टप्पा हस्तगत केला. माधवरावांचे उद्दीष्ट पूर्ण झाले. पहिल्या तीन पेशव्यांनी जोपासलेले स्वप्न पुर्ण झाल्याचे समजले तेव्हा पेशवे माधवराव मृत्युशय्ये वर होते. पण हया वार्तेने अतीव समाधानी होऊनच त्यांनी प्राण सोडला. पेशवे माधवराव वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी पुण्याजवळ थेऊर येथे बुधवार दि. १८ नोव्हेंबर १७७२ रोजी निधन पावले.