या Blog मधून आपण पाहणार आहोत कि घोंगडीचे धार्मिक महत्त्व व फायदे. या आधीच्या Blog मध्ये आपण घोंगडीचे आरोग्यविषयक फायदे पहिले आहेत. तो Blog वाचण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.
घोंगडीचे धार्मिक फायदे म्हणा किंवा घोंगडीचे धार्मिक महत्त्व हे फक्त हातमागावरील जावळाच्या घोंगडी पासूनच सिद्ध होते. आता हे हातमागाची घोंगडी काय असते? जावळाची घोंगडी काय असते? हे प्रश्न काहींना पडले असतील.
आजच्या काळात घोंगडीच्या विणकामावरून दोन प्रकार पडले जातात. एक म्हणजे हातमाग व दुसरी म्हणजे मशीनमेड. मशीनमेड म्हणजे डुप्लिकेट घोंगडी. जी मशीन वर तयार केली जाते व ज्यामध्ये ७० ते ८० टक्के कॉटन असते व उर्वरित २० ते ३० टक्के लोकर असते.
तर दुसरा प्रकार असतो तो म्हणजे हातमाग. हातमाग घोंगडी म्हणजे ओरिजिनल घोंगडी. जी कारागीरामार्फत हातमागावर तयार केली जाते. जी तयार होईल ७ ते ८ दिवस लागतात व ज्यामध्ये पूर्णपणे म्हणजे १००% लोकरीचा वापर केला जातो.
आणि लोकरीवरून हातमाग घोंगडीचे दोन प्रकार पडतात. एक म्हणजे जावळाची घोंगडी व दुसरी मोठ्या मेंढ्याच्या लोकरीची घोंगडी किंवा तिला आपण पारंपरिक घोंगडी हि म्हणतो. जावळाची घोंगडी म्हणजे मेंढ्याच्या लहान पिल्लाची, जिला आपण कोकरू म्हणतो त्या कोकराची पहिली केस म्हणजे पहिल्या लोकर पासून जी घोंगडी बनते तिला जावळाची घोंगडी म्हणतो. हि जवळची घोंगडी वेग-वेगळ्या आकारात उपलब्ध असते व काळ्या, पांढऱ्या, करड्या रंगात भेटते.
पण जेव्हा आपण हातमागावरील जावळाची घोंगडी घेयला जातो तेव्हा आपल्याला मशीनमेड पानिपतची घोंगडी दिली जाते. ज्यात ७० ते ८० टक्के कॉटन मिक्स असते. तिला पानिपत येथे शॉल म्हणतत. खरी-खोटी जावळ लोकरीची पांढरी व काळी घोंगडी कशी ओळखायची या बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील Video नक्की पहा.
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जावळ लोकरीचीच घोंगडी का? मोठ्या मेंढ्यांच्या लोकरीपासून बनलेली घोंगडीला धार्मिक महत्व का नाही? याचे कारण एकच कि पिल्लं शुद्ध असतात, संभोग त्याच्या आयुष्यात आलेला नसतो म्हणून त्यांच्या त्या लोकरीला महत्व आहे. लोकर म्हणजे मेंढ्यांची केस.
जावळाची घोंगडी हि तीन रंगाची असते. १.काळी, २.पांढरी व ३.करडी. यातील करडी रंगाची जावळ घोंगडी कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात वापरत नाहीत. जावळ लोकरीची फक्त काळी व पांढरी रंगाचीच घोंगडी धार्मिक कार्यात वापरतात. या दोन्ही घोंगडीना सर्व धर्म ग्रंथात अन्य साधारण महत्व आहे. काळ्या(जावळ) घोंगडीचे धार्मिक महत्त्व व फायदे खालीलप्रमाणे,
- काळ्या जावळाच्या घोंगडीचे पहिले धार्मिक महत्त्व म्हणजे खंडोबाच्या तळी-भंडारा विधीत पूजा मांडण्यासाठी केला जातो तसेच लंगर तोडताना घोंगडी खांद्यावर घेऊन लंगर तोडली जाते.
- दुसरे महत्व म्हणजे मार्गशीष महिन्यातील खंडोबाचे नवरात्र असते. जे कोणी ते नवरात्र पाळतात त्यांनी नवरात्र संपेपर्यत झोपण्यासाठी काळ्या घोंगडीचा वापर करावा.
- तिसरे महत्व म्हणजे जोतिबा देवाच्या सर्व पूजा काळ्या जावळाच्या घोंगडीवर कराव्यात. तसेच जोतिबा ज्यांचा कुलदैवत आहे अशा लोकांच्या जागरण गोंधळात पूजा मांडण्यासाठी काळ्या घोंगडीचा वापर करावा.
- चोथे महत्व म्हणजे नवनाथांचे पारायण वाचन काळ्या जवळच्या घोंगडीवर बसून करावे.
- पाचवे महत्व म्हणजे दसऱ्याला जे शास्त्र पूजन असते ते काळ्या घोंगडीवर ठेऊन करतात.
- सहावे महत्व म्हणजे दान करताना काळी घोंगडी दान करावी. काहींना शनी दोष असतो किंवा काहींना पितृदोष असतो किंवा इतर काही कारणांमुळे घोंगडी दान करण्यास सांगितली जाते तेव्हा लक्षात ठेवा काळी घोंगडी दान करावी. आता हिट एक कंडिशन आहे. काहींच्या घरामध्ये काळा रंग वर्ज असतो अशा लोकांनी पांढरी जावळाची घोंगडी दान करावी.
- सातवे महत्व म्हणजे अनेक देवांचे नवस केले जातात जसे कि बिरोबाचा नवस, बाळुमामाचा नवस व अजून काही. तर या नवसाची फेड करताना काही लोक घोंगडी दान करतात तेव्हा काळी जवळची घोंगडी दान करावी.
- आठवे महत्व म्हणजे डोहाळे कार्यक्रमातील देव पूजेसाठी. ज्यावेळी डोहाळे जेवणाचा कार्यक्रम असतो तेव्हा जी पूजा मांडली जाते तेव्हा काळ्या घोंगडीचा वापर करावा.
- नववे महत्व म्हणजे, आपल्या देशात सर्वात जास्त हि महादेवाची मंदिर आहेत जसे रांझेशवर, माणकेश्वर आधी. तर या सर्व देवांच्या धार्मिक कार्यसाठी काळी जावळाची घोंगडी वापरली जाते, तसेच जे महादेवाची अवतार आहेत अशा ठिकाणी हि काली घोंगडी वापरावी.
- दहावे महत्व म्हणजे, देवींच्या नवरात्रात अनेक महिला नऊ दिवस उपवास करतात तेव्हा अशा महिलांनी झोपताना काळ्या जावळाच्या घोंगडीचा वापर करावा.
- अकरावे महत्व म्हणजे, दिपावली मध्ये जे लक्ष्मी पूजन असते तेव्हा ती पूजा घोंगडीवर मांडावी.
- बारावे महत्व म्हणजे, मायाक्का देवी, बिरोबा, सतोबा, धुळोबा, भभिवई व बाळूमामा देवाच्या सर्व पूजेसाठी काली घोंगडी वापरावी.
- तेरावे महत्व म्हणजे, पंढरीची वारी करणाऱ्या वारकऱ्यांना दान म्हणून काळी घोंगडी दिली जाते.
- चोदावे महत्व म्हणजे, किर्तन सोहळ्यात किर्तनकार ज्या जागेवर उभेराहून विवेचन करतात त्याला नारदाची गादी म्हटले जाते व हि नारदाची गादी म्हणून काळी जावळाची घोंगडी घेईची असते.
- पंधरावे महत्व म्हणजे, मार्गशीष महिन्यात दर गुरुवारी देवीची पूजा केली जाते. हि पूजा काळी घोंगडीवर मांडली जाते.
- सोळावे महत्व म्हणजे ज्या वेळेस शेतात पेरणी केली जाते तेव्हा जी पूजा मांडली जाते ते काळ्या जवळच्या घोंगडीवर मांडतात. थोडक्यात तुम्हाला एक समजले असेल कि ज्या आपण देवांच्या पूजा मांडतो त्या कपड्यांवर न मांडता घोंगडीवर मांड्याच्या असतात.
काहींना प्रश्न असतो कि घोंगडीवरच का? कारण आधी सांगितल्याप्रमाणे घोंगडीला सर्व धर्माच्या ग्रंथात म्हह्त्व आहे. ऋग्वेदात घोंगडीचे महत्त्व सांगितलं आहेत तर अनेक संतांच्या अभंगवाणी तुन आपल्याला घोंगडीचे महत्त्व समजते. घोंगडीवर मांडलेल्या पूजेला विटाळ होत नाही ना शिवता शिव होत नाही.
काहींना अजून एक प्रश्न असतो कि जावळाची घोंगडी व कांबळ यामध्ये काय फरक असतो?
जावळाची घोंगडी काय असते हे मी आधी सांगितले आहेच आणि कांबळ म्हणजे जावळ लोकरीची काळी घोंगडीच व त्यावर एका बाजूला तीन किंवा दोन रेषा असतात. तीन रेषांपैकी दोन रेषा एक सारख्या असतात व एक लहान असते अशा जावळ घोंगडीला अडीज रेघी घोंगडी किंवा अडीज रेघी कांबळ म्हणता. आणि ज्या जावळ घोंगडीवर दोन रेषा असतात त्यातील एक मोठी असते व एक लहान असते अशा जावळ घोंगडीला दिड रेघी घोंगडी किंवा दिड रेघी कांबळ म्हणतात.
हे अडीज रेघी किंवा दिड रेघी कांबळ असते ना ते फक्त धनगर समाजातील बिरोबा, सतोबा, धुळोबा, महालिंगराया किंवा रेवणसिद्ध या देवांच्या खांद्यावर देण्यासाठी व त्या देवांची सेवा करणारे सेवकांना वापरायची परवानगी असते. जे मुख्य पुजारी असतात ते अडीज वापरता व त्याचे शिष्य दिड रेघी वापरता. आपण सामान्य लोक एक पांढरी रेषा असलेली जावळ काली घोंगडी वापरु शकतो. फक्त अशाप्रकारे उभ्या रेषा असलेली घोंगडी नाही वापरू शकता आणि महत्वाचे म्हणजे बिरोबा, महालिंगराया या देवांच्या खांद्यावर कांबळ देतो म्हणून खंडोबा. विठल यांच्या खांद्यावर कांबळ द्याची काही गरज नाही. आपण जावळ काळी घोंगडी देऊ शकतो.
पांढऱ्या जावळ घोंगडीचे धार्मिक महत्त्व व फायदे खालीलप्रमाणे,
- पांढऱ्या जावळाच्या घोंगडीचे पहिले धार्मिक महत्त्व म्हणजे मार्गशीष महिन्यात दत्त जयंतीच्या आधी जे पारायण वाचन असते तेव्हा बेठक म्हणून हि घोंगडी वापरली जाते.
- दुसरे महत्व म्हणजे गुरु चरित्राचे वाचन करताना पांढरी जावळ घोंगडी वापरली जाते.
- थोडक्यात सांगायचे म्हटले तर दत्तगुरु महाराज, स्वामीसमर्थ, रामदास, शेगावचे गजानन महाराज यांच्या सर्व विधीसाठी व या सर्व संतांच्या पोती, ग्रंथन वाचन करताना बेठक म्हणून पांढरी जावळाची घोंगडी घेतात. हे या घोंगडीचे तिसरे महत्त्व आहे.
- त्यानंतरचे महत्व म्हणजे नृसिह महाराज यांच्या सर्व विधीसाठी व पोती, ग्रंथ वाचन करताना पांढरी जवळची घोंगडी वापरतात.
- त्यानंतरचे महत्व म्हणजे तुकाराम महाराज च्या गाथा, सोपानकाका महाराज, निवृत्ती महाराज, आदिशक्ती मुक्ताबाई व संत ज्ञानेश्वर महाराज यांची ज्ञानेश्वरी वाचवताना पांढरी जवळची घोंगडी वापरली जाते. थोडक्यात सांगायचे म्हटले तर आपले जे संत झाले यांच्या धार्मिक कार्यसाठी पांढरी घोंगडी वापरावी.
- त्यानंतरचे महत्व म्हणजे रामायण वाचताना, महाभारत वाचताना पांढऱ्या घोंगडीचा वापर करातात.
- त्यानंतरचे महत्व म्हणजे कृष्ण भक्ती, विष्णू भक्ती करताना पांढऱ्या घोंगडीच वापर करतात.
- त्यानंतरचे महत्व म्हणजे हिंदू धर्मात अनेक पंथ आहेत. जसे कि महानुभाव पंथ. या पंथामध्ये पांढऱ्या जावळाच्या घोंगडीला महत्त्व आहे. महानुभाव पंथातील गुरूंना घोंगडी दान करताना पांढरी जावळाची करतात. ते बेठकीचे आसन म्हणून वापरू शकतात.
- ज्यांच्या घरात काळा रंग व्यर्ज आहे असे लोक देवीच्या पूजा करताना पांढऱ्या रंगाची घोंगडी वापरतात.
- त्यानंतरचे महत्व म्हणजे ध्यान साधना करताना बेठक म्हणून पांढऱ्या जवळच्या घोंगडीचा वापर करता.
पांढऱ्या जावळ घोंगडीबद्दल लोकांना काही प्रश्न असतात. जसे कि, साधना करताना आसन वापरावे कि घोंगडी? तर एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. नामस्मरण किंवा ध्यानसाधना करताना काही नियम असतात. त्यामध्ये एक नियम असा आहे कि, साधना करताना १००% लोकरीपासून बनलेले आसन किंवा घोंगडी वापरावी लागते, व जेव्हा तुम्ही मांडी घालून बसता तेव्हा त्यावरून गुडघे बाहेर नाही गेले पाहिजे.
जेव्हा आपण साधनेसाठी पूजा-आसन वापरतो तेव्हा आपण मांडी घातली कि गुडघे बाहेर जातात. त्यामुळे येथे अपान ठाम पणे असे सांगू शकतो कि! एक तर ते आसन हातमागावरील जावळ लोकरीचे पाहिजे व मांडी घातली तर त्यावरून गुडघे बाहेर नाही गेले पाहिजेत.
आसनाचा आकार कमीत २.५×२.५ फू. फूट असावा किंवा छोटे आसना ऐवजी हातमागावरील जवळ लोकरी पासून बनलेली मोठ्या आकाराची घोंगडी वापरलेली केव्हाही बरी. जसे कि ८*४ किंवा ९*४ फूट आकाराची. कारण आपण त्याची घडी केली तर अनुक्रमे ४*४ कवा ४*४.५ आपल्याला आकार मिळतो. ध्यान-साधना हा विषय खूप मोठा आहे त्यामुळे जर तुम्ही प्रथमच साधना करत असाल तर तुम्हाला मार्गदर्शक हवा. हे असं कधी पण योग्यच.
त्यानंतर काही लोकांना प्रश्न असतो कि, पूजा करताना आसन वापरावे कि घोंगडी?
तर देव पूजा करताना जर आसनावर आपण मांडी घालून बसलो व त्यानंतर पाय थोडेफार बाहेर आले तरी काही अडचण नसते त्यामुळे तुम्ही पूजा आसन वापरु शकता फक्त ते खरे असावे. तर आसनामध्ये हि ओरिजिनल व डुप्लिकेट आसन येतात. यानंतरचा पुढील विडिओ आपण खरे व खोटे आसन ओळखायचे कसे यावर बनवणार आहे.
यानंतर लोकांचा शेवटचा प्रश्न येतो कि, योगा करताना योगासन वापरावे कि घोंगडी?
तर योगा करताना कधीही योगासन वापरणेच योग्य. कारण आपण योग करताना अनेक योगप्रकर करत असतो. घोंगडी हि अंथरून त्यावर झोपावे याप्रकारे विणली जाते तर योगासन तयार केल्यानंतर त्यावर रोलर फिरवला जातो व थोडाफार खळीचा वापर हि करतात. त्यामुळे वेगवेगळे योगप्रकर केले तरी योगासन उसवायचा काहीच घोका नसतो.
तसेच मोठ्या लोकरीच्या घोंगडीचे फायदे सांगायचे म्हटले तर मोठ्या घोंगडीवर झोपल्याने सर्प व विंचूसारखे प्राणी जवळ येत नाहीत. या घोंगडीला थोडासा वास असतो त्यामुळे हे प्राणी जवळ येत नाही. या घोंगडीचा वापर शेतात, फळ-बागांमध्ये, सीमेवरील जवान, पशु पालन करणारे व भात शेती करणारे लोक करतात.
तुम्ही जर ऐकले असेल कि, घोंगडीवर झोपल्यामुळे डास, ढेकूण चावत नाही किंवा उन्हाळ्यात थंडावा देते तर थंडीत उब . तर असल्या भूलथापांना अजिबात हि बाळी पडू नका. घोंगडी थंडीत उब देते हे बरोबर आहे मात्र बाकीच्या गोष्टींत काहीही तथ्य नाही.
या लेखाच्या शेवटी एक गोष्ट सांगायची आहे. ती म्हणजे मी काही धर्म अभ्यासक किंवा धर्म शास्त्राचा विद्वान पंडित नाही मात्र धर्मशास्त्राचा अभ्यास असणाऱ्या जेष्ठ लोकांकडून मला हि माहिती भेटली आहे. ती माहिती मी तुम्हा सर्वांसमोर मांडली आहे.