Description
मुळ भाषा : फारसी
इंग्रजी अनुवाद : जदुनाथ सरकार
लेखक : मोहनसिंग
पुस्तक संपादन : रघुवीर सिंह
प्रकाशक :
प्रकाशन : 1998
महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जीवन संघर्षाचा अभ्यास करतांना अनेक अडचणींचा सामना अभ्यासकांना करावा लागतो महाराजा यशवंतरावांनी स्वतः चा राज्यभिषेक केल्यानंतर भानपुरा येथून आपल्या स्वतंत्र राज्याचा कारभार पाहिला होळकर रियासतीची भानपुरा तिसरी राजधानी होय.
भानपुरा शहरातील सरकार वाड्यात महाराजा यशवंतरांचा कुटुंब कबीला राहत असे तर महाराजा स्वतः हे इंद्रगड आणि नावली येथील सैनिकी छावणीत राहत असत येथेच त्यांनी तोफखाना सुरू केला होता ज्यात त्यांनी स्वतःहजार तोफा तयार करण्याचा चंग बांधला होता.
हिंगलाज गड,मुकुंदरा घाटी,कवला, नावली या परिसरात होळकरांची लाखाची खडी फौज इंग्रजांच्या विरोधात जशास तसे लढण्यासाठी तयारी करीत होती.महाराजा यशवंतराव होळकर यांनी इंग्रजाना ज्या घाटात सतत पाणी पाजले त्या मुकुंदरा लढाईचे पडसाद थेट ब्रीटन मध्ये उमटले होते …….
महाराजा यशवंतराव होळकर यांचा विश्वासू मात्र पुढे दगाबाजी करणारा लाला भवानी शंकर खत्री याने स्वतः च्या रोजनिशीत ब-याच नोंदी घेतलेल्या आहेत यावर वाकई होलकर नावाचे पुस्तक लिहलेले असुन पुस्तकाचा तपशील खालीलप्रमाणे आहे संग्रहात असावे असे पुस्तक वाकई होलकर
Kindly Read Cancellation & Refund Policy
Reviews
There are no reviews yet.