-
White Puja Asan₹700.00
-
Black Puja Asan₹700.00
-
Meditation Asan – White₹1,000.00
-
White Woolen Yogamat₹1,400.00
-
Black Woolen Yogamat₹1,400.00
-
White Jen Ghongadi Aasan₹1,400.00
-
Black Jen Ghongadi Aasan₹1,400.00
AhilyaStore चे लोकरीचे आसन का वापरावे?
- १००% जावळ लोकरीचा वापर
- सर्व आसन हातमागावर बनवलेले
- उच्च दर्जाच्या लोकरीचा वापर
- २४*७ तास Customer Support
- Cash On Delivery सेवा उपलब्ध
- Online Order उपलब्ध
- Free Home Delivery
- Bill व Tracking Code तुमच्याशी Share केला जातो
- Refund and Return Policy
लोकरीच्या आसनाचे धार्मिक महत्व
- देव पूजा करताना पुजाआसन वापरावे.
- पारायण करताना जपआसन वापरावे.
- साधना करताना साधनाआसन वापरावे.
- नर्मदा परिक्रमा करताना योगासन वापरावे.
- रोज योग करताना योगासन वापरावे.
आसनाचे प्रकार
रंगावरून
हातमागावरील Original आसनाचे रंगावरून दोन प्रकार असतात. १.पांढरे व २.काळे. आसन तयार करताना फक्त जावळ लोकरीचा वापर केलेला असतो. जावळ लोकर म्हणजे काय असते हि माहिती खाली सविस्तर दिली आहे किंवा Read More करू शकता.
वापरावरून
हातमागावर(Original) बनवलेल्या लोकरीच्या आसनाचे वापरावरून तिन प्रकार पडतात. ते खालील प्रमाणे,
- पूजा आसन,
- जप आसन किंवा साधनेचे आसन, आणि
- योगासन.
या तिन्ही प्रकारच्या आसनामध्ये फक्त काळा व पांढरा रंग असतो.
१.पूजा आसनाचा वापर पूजेसाठी व धार्मिक जेवणाच्या पंगतीमध्ये बेठक म्हणून करतात. हे आसन सर्वात लहान असते.
२.जप आसनाचा वापर जप करताना किंवा ध्यानसाधनेसाठी करताना करतात. तसेच सत्संग किंवा कीर्तन सोहळा ऐकताना भाविक बेठक म्हणून या मोठ्या आसनाचा उपयोग करतात.
३.योगासनाचा वापर योग अभ्यास किंवा योग्य व्यायाम करताना केला जातो. योगा करताना शक्यतो घोंगडी टाळावी व त्याऐवजी योगासनचा वापर योग्य ठरतो कारण योगासनाचे विणकाम त्याप्रकारे केलेले असते.
साधनेसाठी आसन महत्वाचे का? घोंगडी?
मुळात नामस्मरण किंवा ध्यान साधनेसाठी जे आसन असेल ते हातमागावरील ओरिजिनल जावळ लोकरीचे पाहिजे. मशीनमेड(डुप्लिकेट) नसावे. काही जणांना प्रश्न पडला असेल कि हे हातमाग काय असते? मशीनमेड काय असते? व हि जावळ लोकरीचे म्हणजे काय?
आसन किंवा घोंगडीच्या विणकामावरून दोन प्रकार पडतात. एक हातमाग व दुसरा मशीनमेड. मशीनमेड म्हणजे डुप्लिकेट आसन. ज्यामध्ये नायलॉनचा धागा मिक्स असतो व ते आसन मशीनवर बनले जाते तर हातमाग आसन म्हणजे ओरिजिनल आसन. ज्यामध्ये १००% लोकर असते व कारंगीरामार्फत बनवले जाते. ते बनायला हि काही दिवसांचा अवधी लागतो. खालील video मध्ये पहा कि, हातमागाचे पूजाआसन, योगासन व जप आसन कसे तयार होते.
जावळ लोकरीचे आसन म्हणजे मेंढ्यांच्या पिलांच्या पहिल्या लोकरीपासून जे आसन बनवले जाते त्याला जावळाचे किंवा बाळ-लोकरीचे आसन म्हणतात. पूजा आसन, जप किंवा साधने आसन व योगासन हातमागावर तयार करताना जावळ लोकरीचाच वापर करतात.
मोठ्या मेंढ्यांच्या लोकरीपासून घोंगडी किंवा धनगरी जेन तयार करता. मोठ्या लोकरीपासून जी घोंगडी तयार होते तिला पारंपारिक किंवा मोठ्या लोकरीची घोंगडी म्हणतात. तर जेन म्हणजे लोकरीपासून तयार केलेली १ इंच जाडीची चटई होय.
आसनाचे मुख्यतो तिन प्रकार असतात. १.पूजा आसन, २.जप आसन आणि ३.योगा आसन. हातमागावर शक्यतो मोठ्या प्रमाणात देव पूजेच्या उद्देशाने पूजा आसन बनवले जातात व त्यांचा आकार २×१.५ फू. किंवा २×२ असतो. आणि साधनेसाठी न-कळत हे पूजा आसन वापरले जाते.
नामस्मरण किंवा ध्यानसाधना करताना काही नियम असतात. त्यामध्ये एक नियम असा आहे कि, साधना करताना १००% जावळ लोकरीपासून बनलेले आसन किंवा घोंगडी वापरावी लागते, व जेव्हा तुम्ही मांडी घालून बसता तेव्हा त्यावरून गुडघे बाहेर नाही गेले पाहिजे. आपल्या शरीराचा कोणताही भाग हा जमिनीला स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यावी लागते.
जेव्हा आपण साधनेसाठी पूजा-आसन वापरतो तेव्हा आपण मांडी घातली कि गुडघे बाहेर जातात. त्यामुळे येथे अपान ठाम पणे असे सांगू शकतो कि! एक तर ते आसन हातमागावरील जावळ लोकरीचे पाहिजे व मांडी घातली तर त्यावरून गुडघे बाहेर नाही गेले पाहिजेत.
आसनाचा आकार कमीत २.५×२.५ फूट असावा किंवा छोटे आसना ऐवजी हातमागावरील जावळ लोकरी पासून बनलेली मोठ्या आकाराची घोंगडी वापरलेली केव्हाही बरी. जसे कि ८*४ किंवा ९*४ फूट आकाराची. कारण आपण त्याची घडी केली तर अनुक्रमे ४*४ कवा ४*४.५ आपल्याला आकार मिळतो.
नामस्मरण किंवा ध्यानसाधना करताना ताठ बसावें. कुठे हि अवघडल्यासारखें किंवा शरीर आवळून बसू नये. तसेंच चेहऱ्यावर ताण येऊ न देतां सहजतेने बसावें. शरीराचे अवयव जास्तीतजास्त सैल असावेत त्यामुळे पायाला मुंग्या येणे, बधिरता येणे हे प्रकार होणार नाहींत. बराच वेळ आरामांत बसता येईल व ध्यानधारणा करताना शरीराकडे लक्ष न जातां ध्यानाकडे लक्ष केंद्रित होईल, अशा प्रकारे सुखासनांत बसावे.
साधनेसाठी बसताना आसन म्हणून दर्भासन, मृगाजिन, व्याघ्रांबर, पांढरी जावळ घोंगडी किंवा आसन आणि श्वेत वस्त्र, हे एकावर एक अंथरून त्यावर बसुन संध्या आदी उपासना करावी. असे व्यास वचन आणि पद्म पुरानात उल्लेख आहेत. माऊली नी ही ज्ञानेश्वरीत असनाचे महत्व आणि त्याचा क्रम सांगीतल आहे.
दर्भासन हे दर्भ या वनस्पतीपासून बनवलेले असते. त्या वनस्पतीची पाने शक्यतो पांढऱ्या किंवा लाला रंगाच्या धाग्याने विणलेली असावीत. वेल्वेटचा वापर केलेले दुर्भासन शक्यतो टाळावे. मृगाजिन व व्याघ्रांबर आत्ताच्या परिस्थीतीनुसार बाळगने गुन्हा आहे त्यामुळे त्याबद्दल लिहणे टाळले आहे.
जावळ घोंगडी किंवा आसन हे मेंढ्यांच्या लहान पिल्ल्याच्या पहिल्या लोकरीपासून बनलेले असते. हातमागाची जावळ घोंगडी किंवा आसन वापरावे, मशीनमेड घोंगडी व आसन टाळावे. श्वेत वस्त्र म्हणजे पांढरे वस्त्र वापरावे.
वरील सर्व आसने नसतील तर त्यातील एक तरी असावे. त्यात ही पांढरे वस्त्र, जावळ लोकरीचे घोंगडी किंवा आसन आणि दर्भासन है प्रत्येकाकडे असेल तर उत्तमच. ध्यानसाधना किंवा उपासना करताना तुमच्या गुरूंचे मार्गदर्शनही म्हत्वाचे असते.
साधारणता: लोकरीच्या आसनावर केलेल्या साधना आणि पुजेपेक्षा दर्भासन वापरून केलेली उपासना लवकरात लवकर सिद्ध होण्यास मदत होते. साधना व उपासना या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. टिपः आत्ताच्या परिस्थीतीनुसार मृग जिन व व्याघ्राबर बाळगने गुन्हा आहे. त्यामुळे त्याची मागणी अथवा विचारपूस करून नये.
आसन घेताना होणारी फसवणूक
जसा घोंगडीमध्ये Original व Duplicate प्रकार आहे तसाच आसना मध्ये हि प्रकार आहे. वर सांगितल्याप्रमाणे मशीनमेड आसन हे Duplicate आसन असतात. ज्यामध्ये नायलॉनचा धागा मिक्स असतो व ते आसन मशीनवर बनले जाते तर हातमागाचे आसन म्हणजे Original आसन. ज्यामध्ये १००% लोकर असते व कारांगीरामार्फत बनवले जाते.
बाजारामध्ये ९९% हे मशीनमेड(Duplicate) आसन भेटत असून काळा, पांढरा, करडा व अनेक वेगवेगळ्या रंगात व आकारात उपलब्ध असते तर Original फक्त काळ्या व पांढऱ्या रंगातच उपलब्ध असते. आपण जेव्हा हि बाजारात पूजेचे, साधनेचे किंवा योगाचे आसन घेईला जातो तेव्हा आपल्याला मशीनमेड आसन दिली जातात व आपली नकळत फसवणूक होते किंवा केली जाते.
Original व Duplicate घोंगडी जशी ओळखली जाते तसे आसन ओळखू शकत नाही कारण Original आसनाला चिंचोक्याची खळ लावली जाते त्यामुळे जेव्हा आपण आसनाची द्शी पेटवतो तेव्हा त्यामधून येणार वास हा केस जळल्याप्रमाणे येत नाही. मात्र तरीही काही पद्धती आहेत त्यावरून सध्यातरी आपण Original व Duplicate आसन कसे ओळखायचे हे ठरवू शकतो.
पांढरे व काळे ओरिजिनल व डुप्लिकेट आसन कसे ओळखावे?
Duplicate पांढरे व काळे आसन वेगवेगळ्या आकारात उपलब्ध असून त्याची ९० रु. पासून २५० रुपयांपर्यत किरकोळ विक्री केली जाते. खाली सध्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या मशीनमेड( Duplicate) पांढऱ्या व काळ्या आसनाचे फोटो दिले आहेत. खालील पद्धतीवरून तुम्ही Original व Duplicate ओळखू शकता,
१.बॉर्डर पहाणे, माशिनमेड पांढऱ्या व काळ्या आसनाला छान दिसावे म्हणून कॉटन च्या कपड्याची चारी बाजून बार्डर शिवली जाते व या आसणाना चिंचोक्याची खळ येत नसल्या कारणामुळे कडक येत नाही. हि आसने मऊ असतात.
Original हातमागाच्या आसनाला कॉटनची बार्डर कधीच येत नाही व ते कडक असते. मात्र भविष्यात लोकांमध्ये खरे व खोट्याची जागृती झाली तर मशीनमेड आसनाची बार्डर शिवणे बंद करतील त्यामुळे बार्डर वरून आसन ओळखणे हा सध्याचा पर्याय आहे, कायमस्वरूपी नाही. भविष्यात मशीनमेड आसनात काही नवीन बदल केले तर येथे नक्की कळऊ.
२.दशा पाहणे, अजून एक माशिनमेड पांढऱ्या रंगाचे आसन मोठ्या प्रमाणात वेगळ्या प्रकारे तयार केले जाते. त्या आसनाला बार्डेर ऐवजी दोन्ही बाजूला १ इंच आकारची दशा येतात, व या ही आसनाला चिंचोक्याची खळ नसल्या कारणामुळे कडक नसते. Original हातमागाच्या शक्यतो १ इंच आकाराची दशी येत नाही व जर दशी असेल तर मोठी येते व एकाच बाजूला असते.
मात्र भविष्यात लोकांमध्ये खरे व खोट्याची जागृती झाली तर या दशा लहान लहान करतील त्यामुळे दशा वरून आसन ओळखणे हा सध्याचा पर्याय आहे. कायमस्वरूपी नाही. भविष्यात मशीनमेड आसनात काही नवीन बदल केले तर येथे नक्की कळऊ.
Buy Online Ghongadi
-
Product on saleBlack Ghongadi – Jawal(8*4 Feet)Original price was: ₹2,300.00.₹2,000.00Current price is: ₹2,000.00.
-
White Puja Asan₹700.00
-
Black Ghongadi – Jawal(9*4 Feet)₹2,500.00
-
Meditation Asan – White₹1,000.00
-
White Woolen Yogamat₹1,400.00
-
Black Woolen Jen – 6*4₹2,400.00
-
Black Woolen Yogamat₹1,400.00