Posted on Leave a comment

घोंगडीचे धार्मिक महत्व व फायदे

या Blog मधून आपण पाहणार आहोत कि घोंगडीचे धार्मिक महत्त्व व फायदे. या आधीच्या Blog मध्ये आपण घोंगडीचे आरोग्यविषयक फायदे पहिले आहेत. तो Blog वाचण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

घोंगडीचे धार्मिक फायदे म्हणा किंवा घोंगडीचे धार्मिक महत्त्व हे फक्त हातमागावरील जावळाच्या घोंगडी पासूनच सिद्ध होते. आता हे हातमागाची घोंगडी काय असते? जावळाची घोंगडी काय असते? हे प्रश्न काहींना पडले असतील.

घोंगडीचे धार्मिक महत्व व फायदे

आजच्या काळात घोंगडीच्या विणकामावरून दोन प्रकार पडले जातात. एक म्हणजे हातमाग व दुसरी म्हणजे मशीनमेड. मशीनमेड म्हणजे डुप्लिकेट घोंगडी. जी मशीन वर तयार केली जाते व ज्यामध्ये ७० ते ८० टक्के कॉटन असते व उर्वरित २० ते ३० टक्के लोकर असते.

मशीनमेड() घोंगडी तयार करताना

तर दुसरा प्रकार असतो तो म्हणजे हातमाग. हातमाग घोंगडी म्हणजे ओरिजिनल घोंगडी. जी कारागीरामार्फत हातमागावर तयार केली जाते. जी तयार होईल ७ ते ८ दिवस लागतात व ज्यामध्ये पूर्णपणे म्हणजे १००% लोकरीचा वापर केला जातो.

हातमागाची(Original) घोंगडी तयार करताना कारागीर

आणि लोकरीवरून हातमाग घोंगडीचे दोन प्रकार पडतात. एक म्हणजे जावळाची घोंगडी व दुसरी मोठ्या मेंढ्याच्या लोकरीची घोंगडी किंवा तिला आपण पारंपरिक घोंगडी हि म्हणतो. जावळाची घोंगडी म्हणजे मेंढ्याच्या लहान पिल्लाची, जिला आपण कोकरू म्हणतो त्या कोकराची पहिली केस म्हणजे पहिल्या लोकर पासून जी घोंगडी बनते तिला जावळाची घोंगडी म्हणतो. हि जवळची घोंगडी वेग-वेगळ्या आकारात उपलब्ध असते व काळ्या, पांढऱ्या, करड्या रंगात भेटते.     

पण जेव्हा आपण हातमागावरील जावळाची घोंगडी घेयला जातो तेव्हा आपल्याला मशीनमेड पानिपतची घोंगडी दिली जाते. ज्यात ७० ते ८० टक्के कॉटन मिक्स असते. तिला पानिपत येथे शॉल म्हणतत. खरी-खोटी जावळ लोकरीची पांढरी व काळी घोंगडी कशी ओळखायची या बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील Video नक्की पहा.

खरी व खोटी काळी घोंगडी कशी ओळखावी?
खरी व खोटी पांढरी घोंगडी कशी ओळखावी?

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जावळ लोकरीचीच घोंगडी का? मोठ्या मेंढ्यांच्या लोकरीपासून बनलेली घोंगडीला धार्मिक महत्व का नाही? याचे कारण एकच कि पिल्लं शुद्ध असतात, संभोग त्याच्या आयुष्यात आलेला नसतो म्हणून त्यांच्या त्या लोकरीला महत्व आहे. लोकर म्हणजे मेंढ्यांची केस.

जावळाची घोंगडी हि तीन रंगाची असते. १.काळी, २.पांढरी व ३.करडी. यातील करडी रंगाची जावळ घोंगडी कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात वापरत नाहीत. जावळ लोकरीची फक्त काळी व पांढरी रंगाचीच घोंगडी धार्मिक कार्यात वापरतात. या दोन्ही घोंगडीना सर्व धर्म ग्रंथात अन्य साधारण महत्व आहे. काळ्या(जावळ) घोंगडीचे धार्मिक महत्त्व व फायदे खालीलप्रमाणे, 

  • काळ्या जावळाच्या घोंगडीचे पहिले धार्मिक महत्त्व म्हणजे खंडोबाच्या तळी-भंडारा विधीत पूजा मांडण्यासाठी केला जातो तसेच लंगर तोडताना घोंगडी खांद्यावर घेऊन लंगर तोडली जाते. 
  • दुसरे महत्व म्हणजे मार्गशीष महिन्यातील खंडोबाचे नवरात्र असते. जे कोणी ते नवरात्र पाळतात त्यांनी नवरात्र संपेपर्यत झोपण्यासाठी काळ्या घोंगडीचा वापर करावा. 
  • तिसरे महत्व म्हणजे जोतिबा देवाच्या सर्व पूजा काळ्या जावळाच्या घोंगडीवर कराव्यात. तसेच जोतिबा ज्यांचा कुलदैवत आहे अशा लोकांच्या जागरण गोंधळात पूजा मांडण्यासाठी काळ्या घोंगडीचा वापर करावा. 
  • चोथे महत्व म्हणजे नवनाथांचे पारायण वाचन काळ्या जवळच्या घोंगडीवर बसून करावे. 
  • पाचवे महत्व म्हणजे दसऱ्याला जे शास्त्र पूजन असते ते काळ्या घोंगडीवर ठेऊन करतात. 
  • सहावे महत्व म्हणजे दान करताना काळी घोंगडी दान करावी. काहींना शनी दोष असतो किंवा काहींना पितृदोष असतो किंवा इतर काही कारणांमुळे घोंगडी दान करण्यास सांगितली जाते तेव्हा लक्षात ठेवा काळी घोंगडी दान करावी. आता हिट एक कंडिशन आहे. काहींच्या घरामध्ये काळा रंग वर्ज असतो अशा लोकांनी पांढरी जावळाची घोंगडी दान करावी.    
  • सातवे महत्व म्हणजे अनेक देवांचे नवस केले जातात जसे कि बिरोबाचा नवस, बाळुमामाचा नवस व अजून काही. तर या नवसाची फेड करताना काही लोक घोंगडी दान करतात तेव्हा काळी जवळची घोंगडी दान करावी. 
  • आठवे महत्व म्हणजे डोहाळे कार्यक्रमातील देव पूजेसाठी. ज्यावेळी डोहाळे जेवणाचा कार्यक्रम असतो तेव्हा जी पूजा मांडली जाते तेव्हा काळ्या घोंगडीचा वापर करावा. 
  • नववे महत्व म्हणजे, आपल्या देशात सर्वात जास्त हि महादेवाची मंदिर आहेत जसे रांझेशवर, माणकेश्वर आधी. तर या सर्व देवांच्या धार्मिक कार्यसाठी काळी जावळाची घोंगडी वापरली जाते, तसेच जे महादेवाची अवतार आहेत अशा ठिकाणी हि काली घोंगडी वापरावी.   
  • दहावे महत्व म्हणजे, देवींच्या नवरात्रात अनेक महिला नऊ दिवस उपवास करतात तेव्हा अशा महिलांनी झोपताना काळ्या जावळाच्या घोंगडीचा वापर करावा. 
  • अकरावे महत्व म्हणजे, दिपावली मध्ये जे लक्ष्मी पूजन असते तेव्हा ती पूजा घोंगडीवर मांडावी. 
  • बारावे महत्व म्हणजे, मायाक्का देवी, बिरोबा, सतोबा, धुळोबा, भभिवई व बाळूमामा देवाच्या सर्व पूजेसाठी काली घोंगडी वापरावी. 
  • तेरावे महत्व म्हणजे, पंढरीची वारी करणाऱ्या वारकऱ्यांना दान म्हणून काळी घोंगडी दिली जाते. 
  • चोदावे महत्व म्हणजे, किर्तन सोहळ्यात किर्तनकार ज्या जागेवर उभेराहून विवेचन करतात त्याला नारदाची गादी म्हटले जाते व हि नारदाची गादी  म्हणून काळी जावळाची घोंगडी घेईची असते. 
  • पंधरावे महत्व म्हणजे, मार्गशीष महिन्यात दर गुरुवारी देवीची पूजा केली जाते. हि पूजा काळी घोंगडीवर मांडली जाते.       
  • सोळावे महत्व म्हणजे ज्या वेळेस शेतात पेरणी केली जाते तेव्हा जी पूजा मांडली जाते ते काळ्या जवळच्या घोंगडीवर मांडतात. थोडक्यात तुम्हाला एक समजले असेल कि ज्या आपण देवांच्या पूजा मांडतो त्या कपड्यांवर न मांडता घोंगडीवर मांड्याच्या असतात. 

काहींना प्रश्न असतो कि घोंगडीवरच का? कारण आधी सांगितल्याप्रमाणे घोंगडीला सर्व धर्माच्या ग्रंथात म्हह्त्व आहे. ऋग्वेदात घोंगडीचे महत्त्व सांगितलं आहेत तर अनेक संतांच्या अभंगवाणी तुन आपल्याला घोंगडीचे महत्त्व समजते. घोंगडीवर मांडलेल्या पूजेला विटाळ होत नाही ना शिवता शिव होत नाही.

काळ्या जावळ घोंगडीवरील लक्ष्मी पूजन
काळ्या जावळ घोंगडीवरील शस्त्र पूजन
काळ्या जावळ घोंगडीवरील लक्ष्मी व शस्त्र पूजन
पाषाणातील बिरोबा देवावरील काळी जावळ घोंगडी
काळ्या जावळ घोंगडीवरील पूजा
नंदीला अर्पण केलेली काळी जावळ घोंगडी

जावळाची घोंगडी काय असते हे मी आधी सांगितले आहेच आणि कांबळ म्हणजे जावळ लोकरीची काळी  घोंगडीच व त्यावर एका बाजूला तीन किंवा दोन रेषा असतात. तीन रेषांपैकी दोन रेषा एक सारख्या असतात व एक लहान असते अशा जावळ घोंगडीला अडीज रेघी घोंगडी किंवा अडीज रेघी कांबळ म्हणता. आणि ज्या जावळ घोंगडीवर दोन रेषा असतात त्यातील एक मोठी असते व एक लहान असते अशा जावळ घोंगडीला दिड रेघी घोंगडी किंवा दिड रेघी कांबळ म्हणतात. 

हे अडीज रेघी किंवा दिड रेघी कांबळ असते ना ते फक्त धनगर समाजातील बिरोबा, सतोबा, धुळोबा, महालिंगराया किंवा रेवणसिद्ध या देवांच्या खांद्यावर देण्यासाठी व त्या देवांची सेवा करणारे सेवकांना वापरायची परवानगी असते. जे मुख्य पुजारी असतात ते अडीज वापरता व त्याचे शिष्य दिड रेघी वापरता. आपण सामान्य लोक एक पांढरी रेषा असलेली जावळ काली घोंगडी वापरु शकतो. फक्त अशाप्रकारे उभ्या रेषा असलेली घोंगडी नाही वापरू शकता आणि महत्वाचे म्हणजे बिरोबा, महालिंगराया या देवांच्या खांद्यावर कांबळ देतो म्हणून खंडोबा. विठल यांच्या खांद्यावर कांबळ द्याची काही गरज नाही. आपण जावळ काळी घोंगडी देऊ शकतो.

  • पांढऱ्या जावळाच्या घोंगडीचे पहिले धार्मिक महत्त्व म्हणजे मार्गशीष महिन्यात दत्त जयंतीच्या आधी जे पारायण वाचन असते तेव्हा बेठक म्हणून हि घोंगडी वापरली जाते. 
  • दुसरे महत्व म्हणजे गुरु चरित्राचे वाचन करताना पांढरी जावळ घोंगडी वापरली जाते. 
  • थोडक्यात सांगायचे म्हटले तर दत्तगुरु महाराज, स्वामीसमर्थ, रामदास, शेगावचे गजानन महाराज यांच्या सर्व विधीसाठी व या सर्व संतांच्या पोती, ग्रंथन वाचन करताना बेठक म्हणून पांढरी जावळाची घोंगडी घेतात. हे या घोंगडीचे तिसरे महत्त्व आहे. 
  • त्यानंतरचे महत्व म्हणजे नृसिह महाराज यांच्या सर्व विधीसाठी व पोती, ग्रंथ वाचन करताना पांढरी जवळची घोंगडी वापरतात. 
  • त्यानंतरचे महत्व म्हणजे तुकाराम महाराज च्या गाथा, सोपानकाका महाराज, निवृत्ती महाराज, आदिशक्ती मुक्ताबाई व संत ज्ञानेश्वर महाराज यांची ज्ञानेश्वरी वाचवताना पांढरी जवळची घोंगडी वापरली जाते. थोडक्यात सांगायचे म्हटले तर आपले जे संत झाले यांच्या धार्मिक कार्यसाठी पांढरी घोंगडी वापरावी.  
  • त्यानंतरचे महत्व म्हणजे रामायण वाचताना, महाभारत वाचताना पांढऱ्या घोंगडीचा वापर करातात. 
  • त्यानंतरचे महत्व म्हणजे कृष्ण भक्ती, विष्णू भक्ती करताना पांढऱ्या घोंगडीच वापर करतात. 
  • त्यानंतरचे महत्व म्हणजे हिंदू धर्मात अनेक पंथ आहेत. जसे कि महानुभाव पंथ. या पंथामध्ये पांढऱ्या जावळाच्या घोंगडीला महत्त्व आहे. महानुभाव पंथातील गुरूंना घोंगडी दान करताना पांढरी जावळाची करतात. ते बेठकीचे आसन म्हणून वापरू शकतात. 
  • ज्यांच्या घरात काळा रंग व्यर्ज आहे असे लोक देवीच्या पूजा करताना पांढऱ्या रंगाची घोंगडी वापरतात.
  • त्यानंतरचे महत्व म्हणजे ध्यान साधना करताना बेठक म्हणून पांढऱ्या जवळच्या घोंगडीचा वापर करता. 

पांढऱ्या जावळ घोंगडीबद्दल लोकांना काही प्रश्न असतात. जसे कि, साधना करताना आसन वापरावे कि घोंगडी? तर एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. नामस्मरण किंवा ध्यानसाधना करताना काही नियम असतात. त्यामध्ये एक नियम असा आहे कि, साधना करताना १००% लोकरीपासून बनलेले आसन किंवा घोंगडी वापरावी लागते, व जेव्हा तुम्ही मांडी घालून बसता तेव्हा त्यावरून गुडघे बाहेर नाही गेले पाहिजे. 

जेव्हा आपण साधनेसाठी पूजा-आसन वापरतो तेव्हा आपण मांडी घातली कि गुडघे बाहेर जातात. त्यामुळे येथे अपान ठाम पणे असे सांगू शकतो कि! एक तर ते आसन हातमागावरील जावळ लोकरीचे पाहिजे व मांडी घातली तर त्यावरून गुडघे बाहेर नाही गेले पाहिजेत. 

आसनाचा आकार कमीत २.५×२.५ फू. फूट असावा किंवा छोटे आसना ऐवजी हातमागावरील जवळ लोकरी पासून बनलेली मोठ्या आकाराची घोंगडी वापरलेली केव्हाही बरी. जसे कि ८*४ किंवा ९*४ फूट आकाराची. कारण आपण त्याची घडी केली तर अनुक्रमे ४*४ कवा ४*४.५ आपल्याला आकार मिळतो. ध्यान-साधना हा विषय खूप मोठा आहे त्यामुळे जर तुम्ही प्रथमच साधना करत असाल तर तुम्हाला मार्गदर्शक हवा. हे असं कधी पण योग्यच.

तर देव पूजा करताना जर आसनावर आपण मांडी घालून बसलो व त्यानंतर पाय थोडेफार बाहेर आले तरी काही अडचण नसते त्यामुळे तुम्ही पूजा आसन वापरु शकता फक्त ते खरे असावे. तर आसनामध्ये हि ओरिजिनल व डुप्लिकेट आसन येतात. यानंतरचा पुढील विडिओ आपण खरे व खोटे आसन ओळखायचे कसे यावर बनवणार आहे.

तर योगा करताना कधीही योगासन वापरणेच योग्य. कारण आपण योग करताना अनेक योगप्रकर करत असतो. घोंगडी हि अंथरून त्यावर झोपावे याप्रकारे विणली जाते तर योगासन तयार केल्यानंतर त्यावर रोलर फिरवला जातो व थोडाफार खळीचा वापर हि करतात. त्यामुळे वेगवेगळे योगप्रकर केले तरी योगासन उसवायचा काहीच घोका नसतो. 

तसेच मोठ्या लोकरीच्या घोंगडीचे फायदे सांगायचे म्हटले तर मोठ्या घोंगडीवर झोपल्याने सर्प व विंचूसारखे प्राणी जवळ येत नाहीत. या घोंगडीला थोडासा वास असतो त्यामुळे हे प्राणी जवळ येत नाही. या घोंगडीचा वापर शेतात, फळ-बागांमध्ये, सीमेवरील जवान, पशु पालन करणारे व भात शेती करणारे लोक करतात.     

तुम्ही जर ऐकले असेल कि, घोंगडीवर झोपल्यामुळे डास, ढेकूण चावत नाही किंवा उन्हाळ्यात थंडावा देते तर थंडीत उब . तर असल्या भूलथापांना अजिबात हि बाळी पडू नका. घोंगडी थंडीत उब देते हे बरोबर आहे मात्र बाकीच्या गोष्टींत काहीही तथ्य नाही. 
या लेखाच्या शेवटी एक गोष्ट सांगायची आहे. ती म्हणजे मी काही धर्म अभ्यासक किंवा धर्म शास्त्राचा विद्वान पंडित नाही मात्र धर्मशास्त्राचा अभ्यास असणाऱ्या जेष्ठ लोकांकडून मला हि माहिती भेटली आहे. ती माहिती मी तुम्हा सर्वांसमोर मांडली आहे.

Posted on 3 Comments

काळी घोंगडी घेताना होणारी फसवणूक

नमस्कार मित्रांनो अहिल्यास्टोर वर तुमचे हार्दिक स्वागत. आजच्या ब्लाँग मध्ये आपण पाहणार आहोत की ओरिजिनल काळी घोंगडी व डुप्लिकेट काळी घोंगडी  ओळखायची कशी ते? व हि काळी घोंगडी खरेदी करताना होत कशाप्रकारे फसवणूक केली जाते? ओरिजिनल जी घोंगडी असते ती हातमागावर बनवली जाते व डुप्लिकेट जी घोंगडी असते ती मशीनवर तयार केली जाते.

AhilyaStore by Rahul Waware

हातमागावरील काळी घोगडी प्रामुख्याने दोन प्रकारची असतात एक म्हणजे जावळाची काळी घोंगडी. जिला आपण बाळ-लोकरीची घोंगडी म्हणून हि ओळखतो व दुसरी म्हणजे मोठ्या मेंढयांच्या लोकरीची घोंगडी. जिला आपण पारंपारिक घोंगडी म्हणून हि ओळखतो. मात्र येथे काही जणांना प्रश्न पडला असेल कि हे हातमागावरील घोंगडी काय असते व जावळाची आणि पारंपारिक घोंगडी काय असते?

तर हातमागाच्यी घोंगडी म्हणजे? आजच्या काळात घोंगडीच्या विणकामावरून दोन प्रकार पडले जातात. एक म्हणजे हातमाग व दुसरी म्हणजे मशीनमेड. मशीनमेड म्हणजे डुप्लिकेट घोंगडी. जी मशीन वर तयार केली जाते व ज्यामध्ये ७० ते ८० टक्के कॉटन असते व उर्वरित २० ते ३० टक्के लोकर असते. 

तर दुसरा प्रकार असतो तो म्हणजे हातमाग. हातमाग घोंगडी म्हणजे ओरिजिनल घोंगडी. जी कारागीरामार्फत हातमागावर तयार केली जाते. जी तयार होईल ७ ते ८ दिवस लागतात व ज्यामध्ये पूर्णपणे लोकरीचा वापर केला जातो.

आणि लोकरीवरून हातमाग घोंगडीचे दोन प्रकार पडतात. एक म्हणजे जावळाची घोंगडी व दुसरी मोठ्या मेंढ्याच्या लोकरीची घोंगडी किंवा तिला आपण पारंपरिक घोंगडी हि म्हणतो.

जावळाची घोंगडी म्हणजे मेंढ्याच्या लहान पिल्लाची, जिला आपण कोकरू म्हणतो त्या कोकराची पहिली केस म्हणजे पहिल्या लोकर पासून जी घोंगडी बनते तिला जावळाची घोंगडी म्हणतो. हि जवळची घोंगडी वेग-वेगळ्या आकारात उपलब्ध असते जसे कि ८×४, ९×४ किंवा १०×४ आणि काळ्या, पांढऱ्या, करड्या रंगात भेटते.    

जावळाची काळी घोंगडी घेताना होणारी फसवणूक –

जेव्हा आपण हातमागावरील काळी जावळाची घोंगडी घेयला जातो तेव्हा आपल्याला मशीनमेड पानिपतची घोंगडी दिली जाते. ज्यात ७० ते ८० टक्के कॉटन मिक्स असते. तिला पानिपत येथे शॉल म्हणतत. ती दिसायला खूप आकर्षित असते व या शॉलची किंमत ४०० ते ७०० रुपया पर्यत असते.

मुळात लोकरीची शॉल असा काय प्रकारच नसतो. हे नवीनच जत्रा, यात्रा मध्ये फॅड सुरु झाले आहे. ७०० ते १५०० पर्यत हि मशीनमेड पानिपतची शॉल लोकरीची शॉल म्हणून विकून लोकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक चालू आहे. खूप कमी लोक आहेत कि जे सांगतात या शॉलमध्ये कॉटन मिक्स आहे.

मशीनमेड Duplicate जावळ घोंगडी

मात्र या पुढचा पण फसवणुकीचा महाधंदा म्हणजे हि पानिपत शॉल जावळाची घोंगडी म्हणून ३००० ते ५००० पर्यत काही महाभाग विकतात व हा सर्वात मोठा घोंगडी व्यवसायातील काळा बाजार आहे. 

पारंपारिक काळी घोंगडी घेताना होणारी फसवणूक –

पारंपारिक घोंगडी किंवा मोठ्या लोकरीची घोंगडी म्हणजे प्रौढ मेंढ्याच्या लोकरीपासून ज्या घोंगडी तयार होतात त्यांना पारंपारिक घोंगडी म्हणतात. हि घोंगडी वेग-वेगळ्या आकारात उपलब्ध असते जसे कि ८*४, ९*४, १०*४ किंवा १२*४ आणि काळ्या, पांढऱ्या, करड्या रंगात भेटते. हि घोंगडी कडक व जड असते.  

जेव्हा आपण हातमागावरील पारंपारिक घोंगडी विकत घेईला जातो तेव्हा आपल्याला जाड वजनाची मशीनमेड घोंगडी दिली जाते. मशीनमेड घोंगडी हि महाराष्ट्रातच तयार होते. मात्र यात्रा जत्रामध्ये  काही जण हिला मोठ्या मेंढ्याच्या लोकरीची घोंगडी किंवा पारंपारिक घोंगडी म्हणून विकतात. या घोंगडीमध्ये हि ७० ते ८० टक्के कॉटन मिक्स असते. 

मशीनमेड Duplicate पारंपारिक घोंगडी

हातमागाची व मशीनमेड काळी घोंगडी ओळखायच्या तीन पद्धती आहेत. ते खालीलप्रमाणे,

घोंगडीची ब्रॉडर पहाणे, हि पद्धत शक्यतो काळ्या रंगाच्या घोंगडीस लागू होते. मशीनमेड घोंगडीला खूप प्रमाणात बॉर्डर असतात. लाल, पिवळा, हिरवा, जांभळ्या रंगाच्या बार्डेर पहावयास मिळतात. त्यामानाने हातमाग घोंगडीला बार्डेर खूपच कमी असतात. मात्र हा मार्ग कायमस्वरूपी लागू होऊ शकत नाही कारण भविष्यात मशीनमेड काळ्या घोंगडीच्या बॉर्डर कमी होऊ शकतात.

घोंगडीची ब्रॉडर पहाणे

घोंगडीच्या दशा पहाणे, हि पद्धत काळ्या, पांढऱ्या व करड्या रंगाच्या सर्व घोंगडीस लागू होते. मशीनमेड घोंगडीच्या दशा लहान असतात व हातमागा घोंगडीच्या दशा मोठ्या असतात. मात्र हा मार्ग कायमस्वरूपी लागू होऊ शकत नाही कारण भविष्यात मशीनमेड घोंगडीच्या दशा मोठ्या होऊ शकतात.   

घोंगडीच्या दशा पहाणे

घोंगडीच्या दशा पेटवने, हि पद्धत काळ्या, पांढऱ्या व करड्या रंगाच्या सर्व घोंगडीस लागू होते. हातमाग घोंगडीच्या दशा आपण जेव्हा पेटवतो तेव्हा केस जळल्यासारखा चर-चर आवाज येतो आणि केस जळल्यासारखा वास हि येतो व मशीनमेड घोंगडीच्या दशा आपण जेव्हा पेटवतो तेव्हा केस जळल्यासारखा चर-चर आवाज येत नाहो व प्लास्टिक जळाल्या सारखे वास येतो. हि एकमेव अशी पद्धत आहे जी कायमस्वरूपी Original व Duplicate घोंगडी ओळखताना उपयोगात येऊ शकते. 

घोंगडीच्या दशा पेटवने

पण जेव्हा तुम्हाला आरोग्यासाठी घोंगडी वापरायची असते किंवा योगसाधने साठी घोंगडी वापरायची असते तेव्हा तुम्ही हातमागाचीच घोंगडी वापरली पाहिजे तसेच काही जणांना हा Blog वाचून असा प्रश्न पडला असेल कि आम्हाला हातमागाची घोंगडी मागवायची आहे? कोठून मागू शकतो? तर अशा लोकांना मी सांगू इच्छितो आम्ही  AhilyaStore.com मार्फत फक्त हातमागाच्या घोंगडी भारत व भारताबाहेर पाठवत आहे. तुम्ही आम्हाला घोंगडी मागविण्यासाठी संपर्क करू शकता.      

वरील Video मध्ये प्रत्यक्षात अधिक माहिती दिलेली आहे. जरूर पहा.

Posted on Leave a comment

घोंगडीचे आरोग्य विषयक फायदे!

आनेक लोकांना प्रश्न असतो कि घोंगडीचे आरोग्यविषयक फायदे काय असतात? घोंगडीचे आरोग्यविषयक फायद्यांबरोबर धार्मिक व इतर फायदे हि असतात मात्र या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत घोंगडीचे आरोग्यविषयक फायदे. 

घोंगडीचे हे फायदे फक्त हातमागावर जी घोंगडी बनली जाते त्यापासूनच मिळतात. आता काही जणांना प्रश्न पडला असेल कि हे हातमाग काय असते. घोंगडीच्या विणकामावरून दोन प्रकार पडतात. एक हातमाग घोंगडी  व दुसरा मशीनमेड घोंगडी. मशीनमेड घोंगडी म्हणजे डुप्लिकेट घोंगडी, ज्यामध्ये कॉटन मिक्स असते व  हातमागावर जी घोंगडी बनवली जाते ती ओरिजिनल घोंगडी असते. ज्यामध्ये पूर्णपणे लोकरीचा वापर केलेला असतो. 

Join Our YouTube Channel Today!

घोंगडीचा पहिला आणि सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे पाठदुखी, कंबरदुखी, वात, सांधेदुखीमध्ये यांपासून आराम मिळतो. आजकालच्या वाढलेल्या धकथकीत जीवनामुळे बहुतांशी लोकांमध्ये पाठदुखी कंबरदुखी हा त्रास दिसून येतो. शक्यतो शहरातील लोकांना हा त्रास असतो तसेच वाढत्या वयामुळे पण हा त्रास सुरु होतो. अशा लोकांनी घोंगडी अंथरून त्यावर नित्यनेमाने झोपावे. त्यांच्यासाठी घोंगडी रामबाण उपाय आहे.  

यांनतर घोंगडी, रक्ताशी संबंधित असणाऱ्या तीन आजारांवर उपयुक्त आहे. ज्यामध्ये घोंगडीमुळे ज्या व्यक्तीला ते आजार असतील त्याला दिलासा मिळतो व त्या व्यक्तीचे ते आजार नियंत्रित राहण्यास मदत होते. पण घोंगडीत असं काय आहे कि ज्यामुळे ती मनुष्याच्या आरोग्यासाठी गुणकारी आहे? असा काहींना प्रश्न पण पडत असेल?

घोंगडी शरीराला टोचते व हे टोचणेच शरीरासाठी आवश्यक असते. घोंगडी जेव्हा शरीराला टोचली जाते तेव्हा ती acupuncture चे कार्य करते व त्यामुळे शरीरातील ब्लड सर्कलशन व्यवस्तीत होते म्हणजे संत पद्धतीने रक्त प्रवाह होतो त्यामुळे रक्तमुळे जे आजार होतात ते होता नाही किंवा जे आजार झालेत ते नितंत्रणात राहतात फक्त घोंगडी रोजच्या वापरात हवी. डॉक्टर हि अशा लोकांना घोंगडी वापरण्याचे सुचवतात.    

रक्ताशी संबंधित पहिला आजार आहे मधुमेह. घोंगडीमुळे ज्या व्यक्तींना मधुमेह झाला आहे अशा लोकांचा मधुमेह नियंत्रित होण्यास मदत होते. त्यामुळे उच्च रक्तदाब व अन्य आजार होण्याचा धोका टळू शकतो.  मधुमेह म्हणजेच डायबिटीज. दर दहा माणसांमागे ४ माणसांना तरी मधुमेहाची समस्या असतेच.

मधुमेह एक अशी समस्या आहे ज्यात रक्तामध्ये साखरेचे व ग्लुकोजची मात्रा वाढल्याने आपलं काम नीट पार पडू शकत नाहीत. पांढऱ्या पेशी ज्या आपल्या शरीराला रोगप्रतिकार शक्ती प्रदान करतात त्यांचा प्रभाव सुद्धा अतिग्लुकोजमुळे कमी होतो. यामुळे मधुमेहासोबत इतरही आजार आणि व्याधी शरीराभोवती विळखा घालू लागतात.

सामान्यत: जेव्हा शरीरात ग्लुकोज व साखरेची मात्रा वाढू लागते तेव्हा हाय ब्लड प्रेशर म्हणजेच उच्च रक्तदाबाचा त्रास सुरु होतो. हे यामुळे होतं कारण रक्तात ग्लुकोज वाढल्याने रक्त गढूळ होतं आणि ह्या दुषित रक्ताचा प्रवाह संथ होऊन हे रक्त वेळेत हृदयापर्यंत पोहोचत नाही. ते रक्त पोहोचावे म्हणून शरीर जोर लावते. यालाच उच्च रक्तदाब म्हणतात. त्यामुळे संत रक्त प्रवाहित होण्यासाठी व मधुमेहामुळे उच्च रक्तदाब सारखा त्रास उदभवू नये म्हणून अशा लोकांनी नेहमी घोंगडी अंथरून झोपावे. 

आजकाल कामाची जीवनशैली अशी झालेली आहे कि १० व्यक्ती नंतर १ ला उच्च रक्तदाब म्हणजेच BP चा त्रास आहे. अशा लोकांनी घोंगडी अंथरून त्यावर नित्यनेमाने झोपावे. घोंगडी शरीराला टोचली जाते व अदोगर सांगितल्याप्रमन ब्लड सर्कलशन व्यवस्तीत होते म्हणजे संत पद्धतीने रक्त प्रवाह होतो त्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.   

रक्ताशी संबंधित तिसरा आजार आहे अर्धांगवायूचा म्हणजेच पॅरालिसीस. अर्धांगवायूचा(पॅरालिसीस) धोका टळतो. अर्धागवायू, पक्षाघात, लकवा, पॅरालिसीस आणि स्ट्रोक ही एकाच आजाराची वेगवेगळी नावे आहेत.  उच्च रक्तदाब असणाऱ्या लोकांना हा आजार उद्भवण्याचा धोका असतो. त्यामुळेअशा लोकांनी हि घोंगडी वापरायला सुरुवात केली पाहिजे. नेहमी झोपताना अंथरून म्हणून तिचा वापर केला पाहिजे. असे केल्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात येण्यास मदत होते.

आपल्या देशात दर मिनिटाला सहा लोकांना अर्धागवायूचा कोणाला ना कोणाला झटका बसतो. प्रत्येक वर्षी पंधरा लाख लोक या आजाराने ग्रासतात, तर दर तीन मिनिटाला एक जण या आजाराने दगावतो. पॅरालिसीसचा ज्याला अटॅक येतो त्याला BP चा त्रास असतो व जेव्हा मेंदूला रक्तप्रवाह होत नाही तेव्हा हा अटॅक येतो पण जेव्हा तुमचा BP च नियंत्रणात असेल तर हा पुढचा संभाव्य धोका टळू शकतो म्हणून अशा लोकांनी हि घोंगडी अंथरून त्यावर नित्यनेमाने झोपावे.

यानंतर घोंगडीचा चोथा फायदा आहे तो ज्यांना पित्ताशयाचा त्रास आहे अशा लोकांसाठी. हा रोग इतका धोकादायक नाही, पण त्याची कारणं, लक्षणं आणि उपचार जितक्या लवकर आपल्याला माहित पडतील तितक्या लवकर आपण त्याच्या त्रासदायक समस्यांपासून आराम किंवा मुक्ती मिळवू शकतो. घोंगडीमुळे हा त्रास ज्या लोकांना आहे अशा लोकांना निश्चितच अराम मिळू शकतो.  

यानंतर शेवटचा फायदा म्हणजे घोंगडीवर झोपल्याने लहान मुलांचा अस्थमा दूर होण्यास मदत होते तसेच कांजण्या व गोवर तापातही घोंगडीचा वापर करतात.

Read More वर Click करा.
काही शंका किंवा सूचना असल्यास संपर्क करा.
[email protected] 
Posted on Leave a comment

मेंढरांची लोकर कात्रण

मेंढ्यांची लोकर कातरणी हि वर्षातुन दोनदा किंवा तिनदा केली जाते, खरं तर मेंढीची कात्रण केल्यानंतर लोकरीची पुर्ण वाढ होण्यासाठी सहा महीने लागतात. काही ठिकाणी कात्रण मशीन द्वारे केली जाते तर काही ठिकाणी पारंपारीक पद्धतीने लोखंडी कात्रीने केली जाते. पण पूर्वी सर्व ठिकाणी पारंपारीक पद्धतीने लोखंडी कात्रीने मेंढ्यांची कात्रण केली जात असे.

पूर्वीच्या काळी कात्रण हि इर्जीक(वारंगुळा) पद्धतीने केली जात असे. काही ठिकाणी हे चित्र आजही नजरेस पडत आहे. इर्जीक म्हणजे जर पाच मेंढपाळ असतील तर सर्वानी मिळून आज एकाच्या मेंढ्यांची कात्रण करायची, काही दिवसांनी दुसऱ्या मेंढपाळांच्या मेंढयांची कात्रण करायची, असे करून ग्रुपमधील सर्व मेंढपाळांच्या मेंढ्याची कात्रण केली जात असे. कात्रणीसाठी येणार खर्च व हे जिकरीचे काम असल्यामुळे असे केले जात असे.

ज्या मेंढपाळांच्या येथे इर्जीक असायची तेथे सर्व पाहुण्यांसाठी गोड-धोड जेवायचे पदार्थ केले जायचे. कात्रण झाले कि सर्वजण गप्पाटप्पा करत जेवणाचा आस्वाद घेत असत. पण आता काळ बदला भरपूर लोक मेंढपाळ व्यवसायातून बाहेर झाले. त्यामुळे या कात्रींचे कारागीरही जवळपास नामशेषच झालेत म्हणून सध्या मेंढ्या कातरणीसाठी लागणाऱ्या कारागीरांचा तुटवडा भासतो तसेच पारंपारीक पद्धतीनं एका मेंढीची कातरणी करण्यासाठी अर्धा ते एक तासापर्यंत वेळ जातो तर यांत्रीक मशीनद्वारे एका मेंढीची लोकर तिन ते पाच मिनीटात कापली जाते.

त्यामुळे आता मेंढ्या कातरणीसाठी यांत्रिक मशीनचा वापर सरास होतो. जो तो मेंढपाळ स्वता मेंढ्याची कात्रण करतोय. पूर्वीची इर्जीक पद्धतीने केली जाणारी कात्रण तर बंदच झाली आहे. कात्रणीनंतर शक्यतो लोकर फेकुनच दिली जाते कारण घोंगडी बनवण्यासाठी जर लोकर कात्रण करणार असाल तर त्यासाठी लागणारे व्यवस्थापन, मेहनत आणि महत्वाचे म्हणजॆ कमी बाजारभाव. आम्हालाही जेव्हा घोंगडीसाठी लोकर गोळा करावी लागते तेव्हा मेंढपाळ बांधवाना काही तरी आमिष दाखवावे लागते तेव्हा आम्हाला लोकर व्यवस्थित मिळत आहे.

आम्ही त्यांना योग्य अमिश दाखवत आहे कारण आम्ही त्यांच्यातीलच एक आहोत म्हणून. पण असे किती दिवस चालणार? आता गरज आहे ती शासनाच्या पुढाकाराची..! कात्रीचे कारागीर कमी असल्यामुळे आधुनीक पद्धतीने लोकर कात्रण करण्यासाठी महाराष्ट्र शासनानं लोकर कापणी मशीन खरेदीसाठी ७५% सबसीडी दिली पाहिजे. लोकरीपासून जेवढ्याही गोष्टी बनत आहेत त्यासाठी परदेशी बाजार पेठ खुली केली पाहिजे. जर परदेशी बाजारात विक्री होऊ लागली तर स्वाभाविकच लोकरीला चांगला भाव भेटेल.

सर्वात चिंतेचा विषय म्हणजे, मेंढपाळ व्यवसाय दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. उद्या हा व्यवसायच बंद झाला तर त्यापासून मिळणारे सर्व उत्पादने नाहीशी होतील. भविष्यात हातमागावरील Original घोंगडीची जागा मशीनवरील Duplicate घोंगडीने घेतली तर वावगे वाटायला नको किंवा काही मोठ्या प्रमाणात ती जागा घेतली पण आहे. मेंढपाळ व्यवसायाला चालना मिळावी म्हणून शासनाने ठोस निर्णय घेतले पाहिजे. नाहीतर येणाऱ्या काळात जे दुर्मिळ आहे ते अधिकच दुर्मिळ होईल हे नक्की.

Posted on Leave a comment

घोंगडीच्या किंमतीत का फरक असेल?

घोंगडी प्रमुख्याने दोन प्रकारे तयार केली जाते, एक म्हणजे हातमागावर व मशीनवर. घोंगडी कशावर तयार केली जाते यावरून तिचे हातमागावरील घोंगडी व मशीन वरील घोंगडी असे दोन मुख्य प्रकार पडतात. बहुतेक लोकांना हि गोष्ट माहित नाही.

पूर्वीच्या काळी सर्व घोंगडी या कारागिरांच्या मार्फत हातमागावर तयार केल्या जात. त्या तयार होण्यासाठी ५ ते ७ दिवस लागत असे. कालांतराने कारागिरांची संख्या कमी झाली त्यामुळे बाजारात हातमागावरील घोंगडीची जागा मशीनवरील घोंगडीने घेतली. आज बाजारात ९९% जी घोंगडी विकली जाते ती मशीनमेड घोंगडी असते.

मशीनमेड काळी घोंगडी

मशीनमेड घोंगडी हि काही तासातच तयार होते. ती दिसायला खूप आकर्षक असते व याच घोंगडीची किंमत ५०० ते ७०० पर्यत असते. या घोंगडीची किंमत एवढी कमी असण्याचे कारण म्हणजे हि घोंगडी डुप्लिकेट असते. यामध्ये ७० ते ८० टक्के कापसाचे किंवा नायलॉनचे सूत मिक्स असते. हि घोंगडी तयार होण्यासाठी फक्त १०० ते १५० रु. खर्च येतो व हि घोंगडी कापसाचे किंवा नायलॉनचे सूत मिक्स केल्याशिवाय तयारच होत नाही त्यामुळे हि घोंगडी स्वस्तात विकली जाते.

मशीनमेड पांढरी घोंगडी

मशीनमेड घोंगडी हि हातमागावरील घोंगडी पेक्षा खूपच आकर्षक दिसायला असते, त्यामुळे ती डुप्लिकेट असून सुद्धा लोकांना ओरिजनल वाटते. म्हणून ग्राहकांची आजच्या काळात मोठया प्रमाणत फसवुनूक होत आहे. पंढरपूर, जेजुरी, अदमापूर, आरेवाडी, पठ्ठनकोडोली, मायाक्का चिंचणी किंवा मुंबई, पुण्यातील ग्राहक बाजारात हि मशीनमेड घोंगडीच विकली जाते व लोकांना याबद्दल माहित नसल्या कारणाने त्यांची नकळत फसवणूक होते किंवा केली जाते.

मशीनमेड करडी घोंगडी

दुसऱ्या बाजूला हातमागावरील घोंगडी असते. हि घोंगडी तयार होण्यासाठी ५ ते ७ दिवस लागतात. त्यासाठी कारागीर खूप कष्ट घेतो आणि यामध्ये पूर्णपणे लोकरीचा वापर केला जातो. त्यामुळे या घोंगडीत वापरलेले मटेरियल म्हणजेच लोकर, ती तयार होण्यासाठी लागलेला वेळ, कष्ट हे सर्व विचारत घेऊन त्यांची किमत ठरते. मोठ्या लोकरीची घोंगडी २००० पासून २५०० पर्यत मिळते तर जावळाची घोंगडी २५०० पासून ३५०० रु. पर्यत मिळते.

हातमागावरील काळी जावळाची घोंगडी

हातमागावरील घोंगडी मशीनमेड घोंगडीच्या प्रमाणात दिसायला जरी आकर्षक नसेल पण आरोग्यविषयक, धार्मिक व अन्य फायदे हे फक्त हातमागावरील घोंगडीमुळेच मिळतात. तर कधी हि, कुठून हि घोंगडी खरेदी कराल तर घोंगडी हातमागावरील आहे का? मशीनमेड? असा प्रश्न करायला विसरू नका. जे प्रामाणिक आहेत ते खरं सांगतील व काही जण लबाडी करतील. Original व Duplicat काळी व पांढरी घोंगडी ओळखायची कशी? हे जाणून घेण्यासाठी खालील Video नक्की पहा.

Original व Duplicat काळी घोंगडी ओळखायची कशी? हे जाणून घेण्यासाठी हा Video नक्की पहा.
Original व Duplicat पांढरी घोंगडी ओळखायची कशी? हे जाणून घेण्यासाठी हा Video नक्की पहा.

आम्ही अशा करतो आज तुम्हाला कळाले असे कि घोंगडीच्या किमतीत एवढा फरक कसा? तसेच मोठ्या लोकरीची घोंगडी म्हणजे काय? जावळाची घोंगडी काय? मशीनमेड व हातमागावरील घोंगडी ओळखायची कसे? हे सर्व जाणून घेण्यासाठी खालील लिंक ला भेट द्या.

Read More वर Click करा.
काही शंका किंवा सूचना असल्यास संपर्क करा.
[email protected]