नमस्कार मित्रांनो अहिल्यास्टोर वर तुमचे हार्दिक स्वागत. आजच्या ब्लाँग मध्ये आपण पाहणार आहोत की ओरिजिनल काळी घोंगडी व डुप्लिकेट काळी घोंगडी ओळखायची कशी ते? व हि काळी घोंगडी खरेदी करताना होत कशाप्रकारे फसवणूक केली जाते? ओरिजिनल जी घोंगडी असते ती हातमागावर बनवली जाते व डुप्लिकेट जी घोंगडी असते ती मशीनवर तयार केली जाते.
हातमागावरील काळी घोगडी प्रामुख्याने दोन प्रकारची असतात एक म्हणजे जावळाची काळी घोंगडी. जिला आपण बाळ-लोकरीची घोंगडी म्हणून हि ओळखतो व दुसरी म्हणजे मोठ्या मेंढयांच्या लोकरीची घोंगडी. जिला आपण पारंपारिक घोंगडी म्हणून हि ओळखतो. मात्र येथे काही जणांना प्रश्न पडला असेल कि हे हातमागावरील घोंगडी काय असते व जावळाची आणि पारंपारिक घोंगडी काय असते?
तर हातमागाच्यी घोंगडी म्हणजे? आजच्या काळात घोंगडीच्या विणकामावरून दोन प्रकार पडले जातात. एक म्हणजे हातमाग व दुसरी म्हणजे मशीनमेड. मशीनमेड म्हणजे डुप्लिकेट घोंगडी. जी मशीन वर तयार केली जाते व ज्यामध्ये ७० ते ८० टक्के कॉटन असते व उर्वरित २० ते ३० टक्के लोकर असते.
तर दुसरा प्रकार असतो तो म्हणजे हातमाग. हातमाग घोंगडी म्हणजे ओरिजिनल घोंगडी. जी कारागीरामार्फत हातमागावर तयार केली जाते. जी तयार होईल ७ ते ८ दिवस लागतात व ज्यामध्ये पूर्णपणे लोकरीचा वापर केला जातो.
आणि लोकरीवरून हातमाग घोंगडीचे दोन प्रकार पडतात. एक म्हणजे जावळाची घोंगडी व दुसरी मोठ्या मेंढ्याच्या लोकरीची घोंगडी किंवा तिला आपण पारंपरिक घोंगडी हि म्हणतो.
जावळाची घोंगडी म्हणजे मेंढ्याच्या लहान पिल्लाची, जिला आपण कोकरू म्हणतो त्या कोकराची पहिली केस म्हणजे पहिल्या लोकर पासून जी घोंगडी बनते तिला जावळाची घोंगडी म्हणतो. हि जवळची घोंगडी वेग-वेगळ्या आकारात उपलब्ध असते जसे कि ८×४, ९×४ किंवा १०×४ आणि काळ्या, पांढऱ्या, करड्या रंगात भेटते.
जावळाची काळी घोंगडी घेताना होणारी फसवणूक –
जेव्हा आपण हातमागावरील काळी जावळाची घोंगडी घेयला जातो तेव्हा आपल्याला मशीनमेड पानिपतची घोंगडी दिली जाते. ज्यात ७० ते ८० टक्के कॉटन मिक्स असते. तिला पानिपत येथे शॉल म्हणतत. ती दिसायला खूप आकर्षित असते व या शॉलची किंमत ४०० ते ७०० रुपया पर्यत असते.
मुळात लोकरीची शॉल असा काय प्रकारच नसतो. हे नवीनच जत्रा, यात्रा मध्ये फॅड सुरु झाले आहे. ७०० ते १५०० पर्यत हि मशीनमेड पानिपतची शॉल लोकरीची शॉल म्हणून विकून लोकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक चालू आहे. खूप कमी लोक आहेत कि जे सांगतात या शॉलमध्ये कॉटन मिक्स आहे.
मात्र या पुढचा पण फसवणुकीचा महाधंदा म्हणजे हि पानिपत शॉल जावळाची घोंगडी म्हणून ३००० ते ५००० पर्यत काही महाभाग विकतात व हा सर्वात मोठा घोंगडी व्यवसायातील काळा बाजार आहे.
पारंपारिक काळी घोंगडी घेताना होणारी फसवणूक –
पारंपारिक घोंगडी किंवा मोठ्या लोकरीची घोंगडी म्हणजे प्रौढ मेंढ्याच्या लोकरीपासून ज्या घोंगडी तयार होतात त्यांना पारंपारिक घोंगडी म्हणतात. हि घोंगडी वेग-वेगळ्या आकारात उपलब्ध असते जसे कि ८*४, ९*४, १०*४ किंवा १२*४ आणि काळ्या, पांढऱ्या, करड्या रंगात भेटते. हि घोंगडी कडक व जड असते.
जेव्हा आपण हातमागावरील पारंपारिक घोंगडी विकत घेईला जातो तेव्हा आपल्याला जाड वजनाची मशीनमेड घोंगडी दिली जाते. मशीनमेड घोंगडी हि महाराष्ट्रातच तयार होते. मात्र यात्रा जत्रामध्ये काही जण हिला मोठ्या मेंढ्याच्या लोकरीची घोंगडी किंवा पारंपारिक घोंगडी म्हणून विकतात. या घोंगडीमध्ये हि ७० ते ८० टक्के कॉटन मिक्स असते.
हातमागाची व मशीनमेड काळी घोंगडी ओळखायच्या तीन पद्धती आहेत. ते खालीलप्रमाणे,
घोंगडीची ब्रॉडर पहाणे, हि पद्धत शक्यतो काळ्या रंगाच्या घोंगडीस लागू होते. मशीनमेड घोंगडीला खूप प्रमाणात बॉर्डर असतात. लाल, पिवळा, हिरवा, जांभळ्या रंगाच्या बार्डेर पहावयास मिळतात. त्यामानाने हातमाग घोंगडीला बार्डेर खूपच कमी असतात. मात्र हा मार्ग कायमस्वरूपी लागू होऊ शकत नाही कारण भविष्यात मशीनमेड काळ्या घोंगडीच्या बॉर्डर कमी होऊ शकतात.
घोंगडीच्या दशा पहाणे, हि पद्धत काळ्या, पांढऱ्या व करड्या रंगाच्या सर्व घोंगडीस लागू होते. मशीनमेड घोंगडीच्या दशा लहान असतात व हातमागा घोंगडीच्या दशा मोठ्या असतात. मात्र हा मार्ग कायमस्वरूपी लागू होऊ शकत नाही कारण भविष्यात मशीनमेड घोंगडीच्या दशा मोठ्या होऊ शकतात.
घोंगडीच्या दशा पेटवने, हि पद्धत काळ्या, पांढऱ्या व करड्या रंगाच्या सर्व घोंगडीस लागू होते. हातमाग घोंगडीच्या दशा आपण जेव्हा पेटवतो तेव्हा केस जळल्यासारखा चर-चर आवाज येतो आणि केस जळल्यासारखा वास हि येतो व मशीनमेड घोंगडीच्या दशा आपण जेव्हा पेटवतो तेव्हा केस जळल्यासारखा चर-चर आवाज येत नाहो व प्लास्टिक जळाल्या सारखे वास येतो. हि एकमेव अशी पद्धत आहे जी कायमस्वरूपी Original व Duplicate घोंगडी ओळखताना उपयोगात येऊ शकते.
पण जेव्हा तुम्हाला आरोग्यासाठी घोंगडी वापरायची असते किंवा योगसाधने साठी घोंगडी वापरायची असते तेव्हा तुम्ही हातमागाचीच घोंगडी वापरली पाहिजे तसेच काही जणांना हा Blog वाचून असा प्रश्न पडला असेल कि आम्हाला हातमागाची घोंगडी मागवायची आहे? कोठून मागू शकतो? तर अशा लोकांना मी सांगू इच्छितो आम्ही AhilyaStore.com मार्फत फक्त हातमागाच्या घोंगडी भारत व भारताबाहेर पाठवत आहे. तुम्ही आम्हाला घोंगडी मागविण्यासाठी संपर्क करू शकता.
वरील Video मध्ये प्रत्यक्षात अधिक माहिती दिलेली आहे. जरूर पहा.
उपयुक्त माहिती, खूप खूप सदिच्छा💐👍
मी एक काळी घोंगडी आणली आहे पण तिचे तुस खूप पडतात त्यामुळे मी तिला झटकून पाहिले, पाण्यात बुडवून पाहिले तर तिचा थोडा रंग गेला आणि तूस पडणे कमी झाले नाही…ही घोंगडी अस्सल आहे की डूप्लिकेट हे समजत नाही आणि या तूस पडण्यावर उपाय काय?
ती ओरिजिनलच आहे त्यामुळे त्यातून शाळ पडत आहे. शाळ पडणे कमी होत नाही तो पर्यत वाऱ्याला वाळत घाला. पुन्हा पाण्यात बुडवू नका व सतत वापरात ठेवा. सतत वापरात नसले कि व वेळो-वेळी उन्हात वाळत घातले नाही तर अशी परिस्तिथी उद्भवते. सतत वापरात ठेवणे कधी हि फायद्याचे. अधिक माहितीसाठी भेट द्या https://ahilyabaiholkar.in/shop/ghongadi