Description
माध्यम : मराठी
Category : शोधप्रबंध
प्रकाशक :
(झेरॉक्स स्वरूपात उपलब्ध, कव्हर, बायडिंग)
दिनांक : एप्रिल २००६
पाने : ३१२
या शोधप्रबंधाची प्रामुख्याने पाच प्रकरणात विभागणी केली आहे.
पहिल्या प्रकरणात अहिल्याबाई होळकर व्यक्तीपरिचयामध्ये त्या ज्या कुटुंबात जन्मल्या त्या कुटुंबाची पार्श्वभूमी, त्यांना आलेल्या अडचणी यांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला आहे.त्यांच्यावर तेथील पडलेले कौटुंबिक व सामाजिक विचारांचा प्रभाव त्यातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची झालेली जडणघडण याचा शोध घेतला आहे. त्यांच्या व्यक्तीमत्त्वातील विविध नेतृत्व गुणांच्या पैलूचा शोध घेतला आहे. अहिल्याबाईंच्या राजकीय विचारप्रणालीचा शोध घेतला आहे. त्या लग्न होऊन होळकर घराण्यात आल्यावर त्या कुटंबाची पार्श्वभूमी तेथील संस्कार याचा प्रभाव त्यांच्यावर कशा प्रकारे झाला याचा परामर्श घेतला आहे.
प्रकरण दोन मध्ये अहिल्याबाई होळकर राजकीय व प्रशासकीय कार्य यामध्ये अनेक राजकीय संघर्षात त्यांनी होळकर राज्यात शांतता स्थापन केली याचे राजकीय विश्लेषण केले आहे. अहिल्याबाई होळकरांचे राजकीय नेतृत्व अभ्यासकांनी उपेक्षित ठेवले. त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. समकालीन राज्यकर्त्यांबरोबर त्यांची राजनीती समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्या पेशवेकालीन कालखंडातील साक्षीदार होत्या. त्या काळात त्यांच्या अनुषंगाने ज्या ठळक घटना घडल्या त्यांची कारणमीमांसा केली आहे. पेशवाई टिकली व वाढली ती होळकर,शिंदे यांच्यामुळे त्यामुळे होळकर-शिंदे संबंधाचा अभ्यास केला आहे. अहिल्याबाई होळकरांच्या घरात मल्हारराव होळकरांच्या मृत्यूनंतर जो गृहकलह झाला त्याचे राजकीय विश्लेषण केले आहे. अहिल्याबाई व तुकोजी यांच्या वादात महादजी शिंदे व नाना फडणवीस यांच्या भूमिकांचा परामर्श घेतला आहे. अहिल्याबाईंनी जी आदर्श प्रशासकीय व्यवस्था निर्माण केली त्या व्यवस्थेतील कारणीभूत घटकांचा आढावा घेणे. त्यांनी अबलंबलेली आदर्श न्यायव्यवस्था याचा अभ्यास केला आहे. त्यांच्या परराष्ट्र मीतीचा व ध्येय धोरणांचा तत्कालीन कालखंडात पडलेला प्रभाव याचा अभ्यास या प्रकरणात केला आहे.
प्रकरण तीन मध्ये अहिल्याबाई होळकर यांचे सामाजिक कार्य, यामध्ये त्यांना सामाजिक कार्याची आवडमनस्वी का निर्माण झाली.संपूर्ण देशभर सामाजिक कार्यामागची त्यांची भूमिका तपासण्याचा प्रयत्न केला आहे. तत्कालीन सामाजिक प्रथा, परंपरा, अंधश्रद्धा, स्त्रीविषयक समाजाचा दृष्टिकोन याचे विश्लेषण केले आहे. तत्कालीन यात्रेकरू, गरीब, दुःखी, कष्टी लोकांसाठी जे घाट, धर्मशाळा, विहिरी, कुंड, रस्ते, पाणपोया, वाडे, अन्नछत्र चालूकेली. तलाव बांधले, विद्वानांना आश्रय दिला त्या मागचा उद्देश तपासून पाहणे. प्राण्यांसाठी व पशुपक्षांसाठी केलेल्या सोयी सुविधांचे विश्लेषण केले आहे. १८ व्या शतकातील प्रथा, परंपरा मोडीत काढून त्यांच्या राज्यात काढलेल्या हुंडाबंदीचा आदेश, विधवा स्त्रियांना दत्तकपुत्र घेण्याचा अधिकार व स्त्रिला मुलीच्या लग्नात कन्यादान करण्याचा अधिकार दिला. या बाबींचा विचाराचा अभ्यास केला आहे. भिल्ल, गोंड या भक्षकांना त्यांनी रक्षक बनविले त्या मागच्या त्यांच्या सामाजिक जाणिवेचा परामर्श घेण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रकरण चार मध्ये अहिल्याबाई होळकर यांचे धार्मिक कार्य यामध्ये अखिल मानव जातीचे कल्याण करणारा धर्म त्यांना अपेक्षित होता. हिंदू-मुस्लिम द्वेष करण्यापेक्षा मानवधर्म त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांचे विश्लेषण केले आहे.तत्कालीन धार्मिक काळात मुस्लिम राजवटीने केलेल्या अत्याचाराचा त्यांच्या मनावर खोल प्रभाव पडला. त्यातून त्यांनी अनेक मंदिरांचे जीणोद्वार केले. संपूर्ण भारतभर अनेक ठिकाणी मंदिरे बांधली त्यातून त्यांनी केलेली राष्ट्रबांधणी. धार्मिक कार्याच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीची केलेली जोपासणा याचा अभ्यास केला आहे. तत्कालीन कालखंडात त्या धार्मिकतेकडे का वळल्या. १८ व्या शतकात मनुष्य एकमेकांच्या धर्माचा द्वेष करत असताना त्यांनी मांडेल्या धर्मनिरपेक्ष विचारांचा अभ्यास केला आहे. त्यांचा हा विचार नव्या पिढीच्या समोर
मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रकरण पाच उपसंहार केला आहे. यामध्ये तत्कालीन कालखंडातील विचारांचा व कार्याचा अर्थ आजच्या व्यवस्थेत तपासून पाहिला आहे. त्यांच्या अंगी असलेल्या विविध नेतृत्वातून जे कार्य घडले त्याची चिकित्सा या प्रकरणात केली आहे.त्यांनी केलेले कार्य व विचार आजही किती उपयोगी आहेत याचा परामर्श घेतला आहे. त्यांच्या नेतृत्वातील विविध पैलूया प्रकरणात स्पष्ट केले आहेत. अशा प्रकारे संशोधनाचा हेतूविषद केला आहे.
Kindly Read Cancellation & Refund Policy
Ahilya Store –
संशोधनाचा हेतू : लेखकाचा Review
देशाच्या जडणघडणेत अहिल्याबाई होळकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. १८ व्या शतकात त्यांनी केलेल्या कार्याचा मोठ्या प्रमाणात ठसा उमटविला. या कार्याचे राजकीय विश्लेषण संशोधनातून व्हावे. छत्रपती शिवाजी महाराज, पेशवे यांच्या व मुस्लिम राजवटी सारख्या तत्कालीन राजवटीचा त्यांच्यावर कशा प्रकारे प्रभाव पडला याचा शोध घेणे. मुस्लिम राजवटीने केलेला विध्वंस व भारताची जडणघडण करताना धार्मिक कार्य कशा प्रकारचे करावे याचे चिंतन त्यांनी केले. सामाजिक विषमतेच्या काळात राज्यकारभारात धार्मिक व सामाजिकतेची जोड दिली. मुस्लिम राजवटीने केलेल्या अत्याचाराचा त्यांच्या मनावर खोल प्रभाव पडला. समकालीन राजकर्त्यांबरोबर त्यांची राजनीती समजून घेणे संशोधाचा दुसरा हेतू आहे. अहिल्याबाई होळकर यांच्या जीवन आणि कार्याचा आढावा घेणे. त्यांची कार्य करण्याची दिशा कोणती होती. मराठा कालखंडातील पेशवाई मोठ्या प्रमाणात विविध कारणाने गाजली. यामध्ये अहिल्याबाई होळकरांनी आपल्या कार्यातून महत्त्वाची भूमिका बजावली. या ऐतिहासिक कालखंडातील एक ठळक स्त्री नेतृत्व उपेक्षित राहू नये. त्यांच्या राजकीय व सामाजिक कार्याची भूमिका तपासणे अहिल्याबाईनी होळकर राज्याच्या कल्याणकारी राज्यव्यवस्थेची केलेल्या उभारणीचा अभ्यास करणे.त्यांच्या अंगी असलेल्या विविध नेतृत्व गुणांचा अभ्यास करणे. तत्कालीन कालखंडात असलेल्या अनेक रुढी परंपरेच्या विरोधात घेतलेले निर्णय व कर्तव्य कठोर न्याय व्यवस्थेचा अभ्यास करणे. अहिल्याबाईंच्या उपेक्षित व्यक्तिमत्वाला न्याय देणे हे या संशोधनाचा उद्देश आहे.
सागर –
राणी अहिल्यादेवींचा संपूर्ण इतिहास व लोक कार्य अगदी उत्तम दिलेली आहेत.