Ghongadi Shop in Pune

पुणे मध्ये उपलब्ध घोंगडी

काळी घोंगडी(जावळ)

  • आकार : ९*४ फूट
  • वजन : १ ते १.५ कि.लो च्या दरम्यान 
  • विणकाम : हातमागावर
  • लोकर : जावळ
  • खळ : नाही
  • भाग्येश गुरुजी : 88881 23238, 88307 99821,
    (पुणे-हडपसर)
  • राहुल वावरे : 8999143074

जेव्हा आपण घोंगडी खरेदी करत असतो तेव्हा मोठ्या प्रमाणात Original(हातमागाची) घोंगडी म्हणून Duplicate(मशीनमेड) घोंगडी दिली जाते. मशीनमेड हा प्रकार गेली काही वर्षांपासून बाजारात आला आहे. मशीनमेड घोंगडीमध्ये कॉटन व अन्य सुतांचे मिक्सिंग असते.

अगदी पंढरपूर, अदमापूर, आरेवाडी, पठ्ठनकोडोली, मायाक्का चिंचणी, माळेगाव यात्रा किंवा मुंबई, पुण्यातील ग्राहक बाजारात हि मशीनमेड घोंगडीच विकली जाते व लोकांना याबद्दल माहित नसल्या कारणाने त्यांची नकळत फसवणूक होते किंवा केली जाते. काळी व पांढरी घोंगडी घेताना हि फसवेगिरी केली जाते. याबद्दल आपण थोडक्यात पाहू,

काळ्या घोंगडी मध्ये जावळ लोकरीची घोंगडी(बाळलोकर) व मोठ्या लोकरीची घोंगडी(खळीची किंवा पारंपरिक) असे दोन प्रकार असतात. आपण जेव्हा हातमागावरील काळी जावळाची घोंगडी घेयला जातो तेव्हा आपल्याला मशीनमेड पानिपतची घोंगडी दिली जाते. ज्यात ८० टक्के कॉटन मिक्स असते. तिला पानिपत येथे शॉल म्हणतात. ती दिसायला खूप आकर्षित असते व या शॉलची किंमत ४०० ते ७०० रुपया पर्यत असते मात्र ती येथे जावळाची घोंगडी म्हणून ३००० पासून ते ५००० हजारापर्यत विकली जाते.

मशीनमेड(Dupliacte) पानिपत घोंगडी/शॉल
हातमागाची(Original) काळी(जावळ) घोंगडी

तसेच जेव्हा आपण हातमागावरील मोठ्या लोकरीची किंवा खळीची घोंगडी घेयला जातो तेव्हा आपल्याला मशीनमेड जाड वजनाची घोंगडी दिली जाते. या घोंगडीमध्ये हि  ८० टक्के कॉटन मिक्स असते. या घोंगडीची किंमत ७०० ते ८०० पर्यत असते मात्र हि मोठ्या लोकरीची घोंगडी म्हणून १५०० ते २००० पर्यत विकली जाते.

मशीनमेड(Duplicate) जाड वजनाची घोंगडी
हातमाग(Original) मोठ्या लोकरीची घोंगडी

त्यामुळे मित्रानो जर तुम्ही जत्रांत व यात्रांमध्ये किंवा कोठे हि काळी घोंगडी घेताय तर सावधान.

पांढऱ्या घोंगडी मध्ये हि जावळ लोकरीची घोंगडी(बाळलोकर) व मोठ्या लोकरीची घोंगडी(खळीची किंवा पारंपरिक) असे दोन प्रकार असतात. आपण जेव्हा हातमागावरील पांढरी जावळाची घोंगडी घेयला जातो तेव्हा आपल्याला मशीनमेड न्यूझीलंडची घोंगडी दिली जाते. ज्यात ८० टक्के कॉटन मिक्स असते. हि घोंगडी न्यूझीलंडला तयार होते. यावर चे फिनिशिंग खूप आकर्षित असते व या घोंगडीची किंमत ५०० ते ८०० रुपया पर्यत असते मात्र ती येथे जावळाची घोंगडी म्हणून ४००० पासून ते ५००० हजारापर्यत विकली जाते.

मशीनमेड(Dupliacte) घोंगडी/न्यूझीलंड घोंगडी
हातमागाची(Original) जावळ लोकरीची घोंगडी

तसेच जेव्हा आपण हातमागावरील मोठ्या लोकरीची किंवा खळीची घोंगडी घेयला जातो तेव्हा आपल्याला मशीनमेड जाड वजनाची घोंगडी दिली जाते. या घोंगडीमध्ये हि  ८० टक्के कॉटन मिक्स असते. या घोंगडीची किंमत ७०० ते ८०० पर्यत असते मात्र हि मोठ्या लोकरीची घोंगडी म्हणून १५०० ते २००० पर्यत विकली जाते.

मशीनमेड(Duplicate) जाड वजनाची घोंगडी
हातमागाची(Original) मोठ्या लोकरीची घोंगडी

AhilyaStore ची घोंगडी का वापरावी?

  • १००% लोकरीचा वापर
  • सर्व घोंगडी हातमागावर बनवलेल्या 
  • उच्च दर्जाच्या लोकरीचा वापर 
  • २४*७ तास Customer Support  
  • Cash On Delivery सेवा उपलब्ध
  • Online Order उपलब्ध
  • Free Home Delivery
  • Bill व Tracking Code तुमच्याशी Share केला जातो 
  • Refund and Return Policy

घोंगडी घेण्यासाठी खालील नंबर ला संपर्क करा.
राहुल वावरे – 8999 143074


Website वरील उपलब्ध घोंगडी व जेन

आमची काम करण्याची पद्धत

पुणे येथे उपलब्ध असलेली घोंगडी हि सातारा जिल्हयातील फलटण, मान, खटाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील कारागिरांनी विणलेली आहेत तसेच काही घोंगड्या या कर्नाटकातील चलकरे येथे विणलेल्या आहेत. तरडगाव ता.फलटण जि.सातारा हे आमचे मुख्य मध्यवर्ती ठिकाण असून येथून संपूर्ण महाराष्ट्रासहित भारतभरात आम्ही Online पार्सल पाठवतो.

घोंगडीचे निरीक्षण करताना AhilyaStore चे राहुल वावरे

कारागिरांकडून घोंगडी जेव्हा तरडगांव येथे जमा केली जाते तेव्हा प्रथम घोंगडीचे निरीक्षण केले जाते. त्यांनतर दुसऱ्या दिवशी सर्व घोंगडी पुन्हा उन्हात वाळत घालून दुसऱ्यांदा बारकाईने निरीक्षण केले जाते आणि जेव्हा घोंगडी पार्सल मध्ये पॅक केली जाते तेव्हा एकदा निरीक्षण केले जाते. अशा प्रकारे एका घोंगडीचे तीन वेळा निरीक्षण केले जाते.

Online Order केल्यांनतर ग्राहकांना घोंगडी भेटल्यावर ती जर काही करणावास्तव Depictive निघाली तर आपण त्यांना घोंगडी Replacement देतो मात्र जेव्हा ग्राहक प्रत्यक्षात येऊन घेतात आणि जर घोंगडी Depictive निघाली तर तेव्हा काही गोष्टींची पूर्तता केल्यानंतर आपण Replacement देतो. आमची घोंगडी १००% लोकरीची असून हातमागावर विणलेली आहे.

काळी, पांढरी, करडी अशा रंगाची व ८×४,९×४, १०×४ या आकाराची आणि जावळाची व मोठ्या मेंढ्यांच्या लोकरीची(पारंपारिक) घोंगडी तुम्ही Online घेऊ शकता किंवा प्रत्यक्षात सध्या पुणे येथे ९×४ आकाराची जावळाची काळी घोंगडी घेऊ शकता. 

काही शंका किंवा सूचना असल्यास संपर्क करा.
[email protected] 

AhilyaStore, Pune
Kamal Niwas, Infront of Shri Sai Hospital,
Mahadeonagar, Manjari Rd,
near Kalpataru Serenity,
Pune, Maharashtra 41230