घोंगडी प्रमुख्याने दोन प्रकारे तयार केली जाते, एक म्हणजे हातमागावर व मशीनवर. घोंगडी कशावर तयार केली जाते यावरून तिचे हातमागावरील घोंगडी व मशीन वरील घोंगडी असे दोन मुख्य प्रकार पडतात. बहुतेक लोकांना हि गोष्ट माहित नाही.
पूर्वीच्या काळी सर्व घोंगडी या कारागिरांच्या मार्फत हातमागावर तयार केल्या जात. त्या तयार होण्यासाठी ५ ते ७ दिवस लागत असे. कालांतराने कारागिरांची संख्या कमी झाली त्यामुळे बाजारात हातमागावरील घोंगडीची जागा मशीनवरील घोंगडीने घेतली. आज बाजारात ९९% जी घोंगडी विकली जाते ती मशीनमेड घोंगडी असते.
मशीनमेड घोंगडी हि काही तासातच तयार होते. ती दिसायला खूप आकर्षक असते व याच घोंगडीची किंमत ५०० ते ७०० पर्यत असते. या घोंगडीची किंमत एवढी कमी असण्याचे कारण म्हणजे हि घोंगडी डुप्लिकेट असते. यामध्ये ७० ते ८० टक्के कापसाचे किंवा नायलॉनचे सूत मिक्स असते. हि घोंगडी तयार होण्यासाठी फक्त १०० ते १५० रु. खर्च येतो व हि घोंगडी कापसाचे किंवा नायलॉनचे सूत मिक्स केल्याशिवाय तयारच होत नाही त्यामुळे हि घोंगडी स्वस्तात विकली जाते.
मशीनमेड घोंगडी हि हातमागावरील घोंगडी पेक्षा खूपच आकर्षक दिसायला असते, त्यामुळे ती डुप्लिकेट असून सुद्धा लोकांना ओरिजनल वाटते. म्हणून ग्राहकांची आजच्या काळात मोठया प्रमाणत फसवुनूक होत आहे. पंढरपूर, जेजुरी, अदमापूर, आरेवाडी, पठ्ठनकोडोली, मायाक्का चिंचणी किंवा मुंबई, पुण्यातील ग्राहक बाजारात हि मशीनमेड घोंगडीच विकली जाते व लोकांना याबद्दल माहित नसल्या कारणाने त्यांची नकळत फसवणूक होते किंवा केली जाते.
दुसऱ्या बाजूला हातमागावरील घोंगडी असते. हि घोंगडी तयार होण्यासाठी ५ ते ७ दिवस लागतात. त्यासाठी कारागीर खूप कष्ट घेतो आणि यामध्ये पूर्णपणे लोकरीचा वापर केला जातो. त्यामुळे या घोंगडीत वापरलेले मटेरियल म्हणजेच लोकर, ती तयार होण्यासाठी लागलेला वेळ, कष्ट हे सर्व विचारत घेऊन त्यांची किमत ठरते. मोठ्या लोकरीची घोंगडी २००० पासून २५०० पर्यत मिळते तर जावळाची घोंगडी २५०० पासून ३५०० रु. पर्यत मिळते.
हातमागावरील घोंगडी मशीनमेड घोंगडीच्या प्रमाणात दिसायला जरी आकर्षक नसेल पण आरोग्यविषयक, धार्मिक व अन्य फायदे हे फक्त हातमागावरील घोंगडीमुळेच मिळतात. तर कधी हि, कुठून हि घोंगडी खरेदी कराल तर घोंगडी हातमागावरील आहे का? मशीनमेड? असा प्रश्न करायला विसरू नका. जे प्रामाणिक आहेत ते खरं सांगतील व काही जण लबाडी करतील. Original व Duplicat काळी व पांढरी घोंगडी ओळखायची कशी? हे जाणून घेण्यासाठी खालील Video नक्की पहा.
आम्ही अशा करतो आज तुम्हाला कळाले असे कि घोंगडीच्या किमतीत एवढा फरक कसा? तसेच मोठ्या लोकरीची घोंगडी म्हणजे काय? जावळाची घोंगडी काय? मशीनमेड व हातमागावरील घोंगडी ओळखायची कसे? हे सर्व जाणून घेण्यासाठी खालील लिंक ला भेट द्या.