Description
जावळाची घोंगडी म्हणजे मेंढ्यांच्या कोकरांच्या पहिल्या लोकरीपासून बनलेली घोंगडी. कोकरू म्हणजे मेंढयांचे पिल्लू व लोकर म्हणजे त्यांची केस. जावळाच्या घोंगडीला बाळलोकरीची घोंगडी किंवा पहिल्या लोकरीची घोंगडी म्हणून हि ओळखले जाते. रंगावरून जावळाच्या लोकरीचे काळी, पांढरी व करडी असे प्रकार पडतात. घोंगडीचे फायदे खालील प्रमाणे –
घोंगडीचे आरोग्यविषयक फायदे
- पाठदुखी, कंबरदुखी, वात, सांधेदुखीमध्ये यांपासून आराम मिळतो.
- उच्च रक्तदाब नियंत्रणात येण्यास मदत होते.
- कांजण्या, गोवर, तापातही घोंगडीचा वापर करतात.
- घोंगडीवर झोपल्याने लहान मुलांचा अस्थमा दूर होतो.
- अर्धांगवायूचा धोका टळतो आणि मधुमेह कमी होण्यास मदत होते.
- घोंगडीला थोडासा स्वतःचा सुगंध असतो त्यामुळे दमा व पित्ताशयाचा त्रास दूर होतो.
घोंगडीचे धार्मिक फायदे
( Note – हातमागावरील पारंपारिक घोंगडी(धाबळ किंवा धाबळी किंवा खळीची), मळणीची घोंगडी (फटकूर), करडी घोंगडी(जावळ) यांचा धार्मिक विधीसाठी वापर करू शकत नाही. हातमागावरील जावळाची काळी किंवा पांढरी घोंगडीचा वापर धार्मिक विधीसाठी केला जातो.)
- सर्व धर्म ग्रंथात घोंगडीला अन्य साधारण महत्व आहे.
- घोंगडीवर केलेली पूजा व ध्यान साधना आत्मसात होतात.
- सर्व प्रकारचे पारायण वाचन करण्यासाठी घोंगडी वापरतात.
- महालक्ष्मी पूजनासाठी घोंगडी वापरतात.
- देवाची तळी उचलण्यासाठी व जागरण गोंधळासाठी घोंगडी आवश्यक असते.
- पितृदोष असणाऱ्यांनी घोंगडी दान करावे. घोंगडी दान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे.
- योगसाधना व अध्यात्मिक पारायण करण्यासाठी.
- डोहाळे कार्यक्रमातील देव पूजेसाठी.
घोंगडीचे इतर फायदे
- उन्हाळ्यात थंडावा देते.
- घोंडीवर झोपल्याने साप, विंचू, मुंगी, गोम, मधमाशा, ढेकूण जवळ येत नाहीत
- झोप येत नसणार्यांसाठी तर हे एक उत्तम औषधच आहे. घोंगडीवर झोपल्याने शांत झोप लागते.
टिप : घोंगडीच्या आयुष्यासाठी तिला २० ते २५ दिवसानंतर उन्हात सुकत ठेवली पाहिजे तसेच जर ती ओली झाली तर लवकरात लवकर उन्हात सुकत ठेवणे.
AhilyaStore ची घोंगडी का वापरावी?
- १००% लोकरीचा वापर
- सर्व घोंगडी हातमागावर बनवलेल्या
- उच्च दर्जाच्या लोकरीचा वापर
- २४*७ तास Customer Support
- Cash On Delivery सेवा उपलब्ध
- Online Order उपलब्ध
- Free Home Delivery
- Bill व Tracking Code तुमच्याशी Share केला जातो
- Refund and Return Policy
घोंगडीबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी जसे कि, घोंगडी कशी वापरावी? घोंगडी बनते कशी? घोंगडी व्यवसायातील फसवेगिरी, अशी अनेक माहिती वाचण्यासाठी पुढील लिंक ला भेट द्या – https://ahilyabaiholkar.in/shop/ghongadi
About AhilyaStore’s Ghongadi,
आमच्या येथील घोंगडी बद्दल थोडक्यात सांगायचे म्हटले तर AhilyaStore जेवढ्याही घोंगडी आहेत त्या सर्व हातमागावरील घोंगडी उपलब्ध आहेत. काही जणांना हा प्रश्न पडला असेल कि हे हातमाग काय असते? घोंगडीच्या विणकामावरून तिचे प्रामुख्याने दोन प्रकार असतात, एक म्हणजे हातमागावर तयार केलेली घोंगडी व दुसरी मशीनवर तयार केलेली घोंगडी. बहुतेक लोकांना हि गोष्ट माहित नसते.
पूर्वीच्या काळी सर्व घोंगडी या कारागिरांच्या मार्फत हातमागावर तयार केल्या जात. त्या तयार होण्यासाठी ५ ते ७ दिवस लागत असे. कालांतराने कारागिरांची संख्या कमी झाली त्यामुळे बाजारात हातमागावरील घोंगडीची जागा मशीनवरील घोंगडीने घेतली. आज बाजारात ९९% जी घोंगडी विकली जाते ती मशीनमेड घोंगडी असते.
मशीनमेड घोंगडी हि काही तासातच तयार होते. ती दिसायला खूप आकर्षक असते व याच घोंगडीची किंमत ४०० ते ५०० पासून १२०० ते १५०० पर्यत असते. या घोंगडीची किंमत एवढी कमी असण्याचे कारण म्हणजे हि घोंगडी डुप्लिकेट असते. यामध्ये ७० ते ८० टक्के कापसाचे किंवा प्लस्टिकचे सूत मिक्स असते. हि घोंगडी तयार होण्यासाठी फक्त १०० ते १५० रु. खर्च येतो व हि घोंगडी कापसाचे किंवा प्लस्टिकचे सूत मिक्स केल्याशिवाय तयारच होत नाही त्यामुळे हि घोंगडी स्वस्तात विकली जाते.
मशीनमेड घोंगडी हि हातमागावरील घोंगडी पेक्षा खूपच आकर्षक दिसायला असते, त्यामुळे ती डुप्लिकेट असून सुद्धा लोकांना ओरिजनल वाटते. म्हणून ग्राहकांची आजच्या काळात मोठया प्रमाणत फसवुनूक होत आहे. पंढरपूर, जेजुरी, अदमापूर, आरेवाडी, पठ्ठनकोडोली, मायाक्का चिंचणी किंवा मुंबई, पुण्यातील ग्राहक बाजारात हि मशीनमेड घोंगडीच विकली जाते व लोकांना याबद्दल माहित नसल्या कारणाने त्यांची नकळत फसवणूक होते किंवा केली जाते.
दुसऱ्या बाजूला हातमागावरील घोंगडी तयार होण्यासाठी ५ ते ७ दिवस लागतात. त्यासाठी कारागीर खूप कष्ट घेतो आणि यामध्ये पूर्णपणे लोकरीचा वापर केला जातो. त्यामुळे या घोंगडीत वापरलेले मटेरियल म्हणजेच लोकर, ती तयार होण्यासाठी लागलेला वेळ, कष्ट हे सर्व विचारत घेऊन त्यांची किमत ठरते. मोठ्या लोकरीची घोंगडी २००० पासून ३००० पर्यत मिळते तर जावळाची घोंगडी २५०० पासून ४००० रु. पर्यत मिळते.
हातमागावरील घोंगडी मशीनमेड घोंगडीच्या प्रमाणात दिसायला जरी आकर्षक नसेल पण आरोग्यविषयक, धार्मिक व अन्य फायदे हे फक्त हातमागावरील घोंगडीमुळेच मिळतात. तर कधी हि, कुठून हि घोंगडी खरेदी कराल तर घोंगडी हातमागावरील आहे का? मशीनमेड? असा प्रश्न करायला विसरू नका. जे प्रामाणिक आहेत ते खरं सांगतील व काही जण लबाडी करतील. AhilyaStore येथे सर्व हातमागावरील घोंगडी उपलब्ध आहेत.
Reviews
There are no reviews yet.