Description
माध्यम : मराठी
लेखक : संतोष ग. पिंगळे
Category : संदर्भ पुस्तक
प्रकाशक : मरहट्टी संशोधन आणि विकास मंडळ पुणे.
पाने : ४७२(१२० पाने रंगीत)
आकार : ७ X ९.५ इंच
हा इतिहास आहे. विजयनगरच्या भव्य व भग्न साम्राज्याच्या स्मृती उराशी कवटाळून छत्रपती संभाजी राजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाच्या प्रचंड फौजेशी मोठ्या शर्थीने झुंजून फक्त स्वराज्याचा गेलेला मुलुखच मिळविणे नव्हे तर भीमथडीच्या तट्टांना प्रत्यक्ष यमुनेचे पाणी पाजणाऱ्या पराक्रमी सरंजामी वीरांचा हा इतिहास आहे. सबंध हिंदुस्थान दणाणून सोडणाऱ्या महापराक्रमी उमरावांचा..
त्यांच्या सरंजामी सत्तांच्या उदयाचा आणि विस्ताराचा तसेच ऱ्हासाचाही. तत्कालीन अस्सल ऐतिहासिक कागदपत्रांमधून आणि हिंदुस्तानभर विखुरलेल्या सरंजामीच्या पाऊलखुणांचा मागोवा शोधणार्या भटकंतीमधून उलगडलेला हा इतिहास म्हणजे एक तेजस्वी शौर्याची व महद् कर्तुत्वाची सारांश रुपी यशोगाथाच. ७ वर्षांच्या अथक संशोधनानंतर साकार झालेला अव्वल सरंजामींच्या कर्तृत्वाची गाथा सांगणारा एक संदर्भ ग्रंथ..
पुस्तकात अनेक घराण्याशी संबंधित मोडी कागदपत्रे, ऐतिहासिक स्मारकांचे फोटो, गढ्या वाड्यांचे फोटो त्यासोबत जुनी चित्र दिलेली आहेत.
Kindly Read Cancellation & Refund Policy
Shrinivas kachare –
‘सरंजामी मरहट्टे’ सुंदर पुस्तक.. मुद्दा न सोडता लिहलेले पुस्तक..!
●परिचित नसलेले विविध धनगर,गवळी,हटकर घराणी यांचा थोरले शाहु छत्रपती यांच्या काळात झालेला उत्कर्ष वाचण्यास मिळाला.
●महाराष्ट्राची पुण्याई महान ज्यामुळे या राष्ट्राच्या पदरात आई तुळजाभवानीने टाकलेलं दान म्हणजे स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवराय. गुलामीतून शिवरायांनी रयत मुक्तच नव्हे तर सुखी देखील केली. स्थापन केलेले स्वराज्य टिकवुन ठेवणे पण बहुत कठीण.
या पुढील कार्यात स्वराज्यनिष्ठेने कार्य करणारी घराणी ससंदर्भ वाचायला भेटल्याचा आनंद आहे.
●लेखकाने घराणी लिहून झाल्यावर अतिशय उत्तमपणे मराठ्यांच्या लष्कराचा सामाजिक दृष्टीक्षेप घेतला आहे.
●तसेच सरदार घराण्यातील स्त्रियांची कर्तबगारी पुरूषांच्या उताऱ्यात दोन ओळीत न सांगता ते सांगण्यासाठी एक वेगळा धडा दिल्याचा आनंद आहे.
●लेखकाने वेळोवेळी इतिहासात ज्याप्रमाणे ‘मराठा’ शब्दाचा उल्लेख स्थानवाचक होता त्याप्रमाणेच वापरल्याचा आनंद आहे. मी स्वतः जातदाखल्यावर ९६ कुळी असलो तरी आधुनिक पद्धतीने फक्त आमच्या समूहालाच मराठा म्हणणे हा अतिशय चुकीचा पायंडा होता. लेखकाने ‘मराठा’ शब्दास योग्य न्याय देऊन तो पुन्हा इतिहासात जसा होता त्या अर्थाने वापरून इतिहासाशी निष्ठा राखण्याचे कार्य केले आहे.
●आणि आज हे पुस्तक वाचुन पूर्ण झाल्यावर इतकेच सांगावे वाटते की वाचक म्हणुन मराठ्यांची जी हाटकर,धनगर,गवळी घराणी होती तिचा अपरिचित इतिहास वाचायला भेटल्याचा आनंद झाला.
●बाकी पुस्तक निर्माण होण्याच्या अगोदर लेखकाचे अभ्यासदौरे चालू असताना चार वर्षांपूर्वी २०१६ च्या सुरूवातीस लेखकासोबत लातूर,हिंगोली,परभणी जिल्ह्यात फिरणे झाले. अशा रीतीने या सुंदर पुस्तकाच्या निर्माण कार्यात कुठेतरी का होईना मी उपस्थित होतो याचा आनंद आहे.
●आणि संतोष पिंगळे सरांबद्दल काय वेगळे सांगावे.. माझे सहकारी मित्र प्रशांत लवटे पाटील यांच्यामुळे माझी आणि त्यांची चार वर्षांपूर्वी ओळख झाली. आणि त्यांच्याबद्दल इतकेच सांगेन की डार्लिंग व्यक्तिमत्व असणारा प्रेमळ माणुस म्हणजे पिंगळे सर.
सरांना पुढील अभ्यासास शुभेच्छा आणि ‘सरंजामी मरहट्टे’ साठी अभिनंदन.
-श्रीनिवास मोहनराव कचरे (लातूर)