Skip to content
Home » धनगरी घोडे

धनगरी घोडे

    सर्वप्रथम या ब्लॉग चे सौजन्य anthra.org यांचे आहे. धनगरी घोडे म्हणजेच भीमथडी घोडे यांच्या बद्दल AhilyaStore.com च्या मार्फत आम्ही संशोधन करत आहोत व हे संशोधन करत असताना आम्हाला हा छोटासा ब्लॉग भेटला. जो सन २०१६ रोजी मराठी व इंग्रजी भाषेतून प्रसिद्ध झाला आहे. “बाणाबाई” या मेंढपाळ धनगर स्त्रीच्या माध्यमातून धनगरी घोड्यांची माहिती ग्राफिक्सच्या माध्यमातून थोडक्यात दिली आहे. नवीन घोडे खरेदी करताना कोण-कोणत्या गोष्टींचा विचार केला जातो हे ग्राफिक्सच्या माध्यमातून उत्तम रित्या मांडले आहे. हा ब्लॉग जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहचावा म्हणून आम्ही येथे प्रसिद्ध करत आहे. सर्व अधिकार Anthra यांना आहेत  तसेच या ब्लॉगचे खरे नाव “बाणाबाईचे घोडे” आहे. या ब्लॉग मध्ये आमच्या सातारा जिल्हयातील सालपे गावाचा उल्लेख आहे.

    सालपे गाव हे तेथील बिरोबा देवस्थानामुळे प्रसिद्ध आहे. बिरोबा हा मेंढपाळ धनगरांचा देव, जो महादेवाचा एक अवतार मानला जातो. हे देवस्थान महादेव डोंगररागांच्या पायथ्याशी वसले आहे. महादेव डोंगररागांमुळे माणदेश व बाणदेश विभागला आहे. डोंगराच्या वरील भागातील माणगंगा नदीच्या खोऱ्याला माणदेश म्हटलं जात तर डोंगराच्या पायथ्याकडील बाणगंगा नदीच्या खोऱ्याला बाणदेश म्हटलं जात.

    सालपे(ता.फलटण) येथील बिरोबा मंदिर
    सालपे जत्रेतील एक क्षण

    सालपे येथील बिरोबा देवाची जत्रा हि कोजागिरी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी असते जी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात असते. येथील जत्रेचे वैशिषट्य म्हणजे या ठिकाणी ‘धनगरी घोड्यांचा’ बाजार भरला जातो. मोठ्या प्रमाणात धनगरी घोड्यांची खरेदी-विक्री होते. हे घोडे म्हणजे मेंढपाळ धनगरांचा जीवनातील एक मुख्य घटक होय. जेव्हा मेंढपाळांचे स्थलांतर चालू असते तेव्हा सर्व घरगुती सामान बांधून नेहण्यासाठी हि घोडी महत्वाची असतात. 

    पुरुष मंडळी जेव्हा मेंढ्यामागे निघतात तेव्हा एका जागेहून सर्व सामान दुसऱ्या जागेला नेह्ण्याची सर्व जबाबदारी हि महिलांची असते व तेव्हा हि भीमथडी घोडी महिलांच्या मदतीला असतात. हि घोडी महिलांबरोबर च असतात. त्यांच्यात वेगळं नातं तयार झालेलं असत. असच या ब्लॉगची नायिका बाणाई व तिझ्या घोड्याबद्दलचा जीवनपट येथे सांगितला आहे व त्यातून धनगरी घोड्याची किंवा भीमथडी घोड्यांची महत्वाची माहिती ग्राफिक्स माध्यमातून खूप सुंदर पद्धतीने मांडली आहे.

    सदृढ प्रौढ घोड्याचे वजन हे २०० ते २५० किलो असते व त्याच्या स्वत:च्या वजनाच्या २० टक्क्यांपेक्षा जास्त म्हणजे ४० ते ५० किलोपेक्षा जास्त वजनाचे ओझे त्याला वाहू देऊ नये. त्याच्या पाठीवर दोन्ही बाजूला सारख्या वजनाचे ओझे लादावे किंवा साधारण सर्व सामानाच्या सारख्याच आकाराचे ओझे लादावे. जड वस्तू जेवढी खालच्या बाजूला ठेवता येईल तेवढी ठेवावी.

    घोड्याच्या पाठीवर ओझे देताना खालील गोष्टी करू नये,

    • घोड्याच्या वजनाच्या २० टक्क्यांपेक्षा म्हणजे ४० ते ५० किलोपेक्षा जास्त वजन ओझे देणे.
    • पाठीवर दोन्ही बाजूला कमी-जास्त वजन ठेवणे.
    • दोन्ही बाजूला सारख्या वजनाचे ओझे विभागून न ठेवणे.
    घोड्याच्या पाठीवर ओझे देताना हे करू नये

    घोड्याच्या पाठीवर ओझे देताना खालील गोष्टी कराव्यात,

    • घोड्याच्या वजनाच्या २० टक्क्यांपेक्षा म्हणजे ४०-५० व किंवा त्यापेक्षा कमी वजन.
    • पाठीच्या दोन्ही बाजूला सारखे विभागलेले.
    • दोन्ही बाजूला समान वजन व आकार विभागलेले.
    घोड्याच्या पाठीवर ओझे देताना हे करावे
    घोड्याचा रंग
    घोडयाचा आकार
    घोड्याचा भोवरा

    हिरड्यांकडे पाहून आपल्याला घोड्याच्या आरोग्याचा अंदाज बांधता येतो.

    प्रमाणबद्ध
    पोटशूळ असेल तर हिरड्यांचा रंग
    गंभीर संसर्गजन्य आजार किंवा फुफ्फुसाचा आजार असल्याचे लक्षण दाखवणाऱ्या हिरड्या

    घोड्यांच्या पायाकडे पाहूनसुद्धा आपल्याला चांगला घोडा ओळखता येतो.

    ज्या घोड्याच्या पायांची सुयोग्य रचना आहे तो दिसायला समतोल दिसतो.
    ज्या घोड्याच्या मागच्या पायाची सुयोग्य रचना आहे, तो अनेक वर्षे सुदृढ राहण्याची शक्यता जास्त आहे.

    पुढच्या पायातले दोष ओळखण्यासाठी खाली काही चित्रे दिली आहेत. पायात दोष असलेले घोड्यांची विक्री होत नाही.

    पायाचे दोष दाखवणारी चित्रे अशा घोड्याच्या पायावर सूज व लंगडणे
    पायाचे दोष दाखवणारी चित्रे अशा घोड्याच्या पायावर सूज व लंगडणे

    मागच्या पायातले दोष

    खालील Video नक्की पहा. यातून अशाच एका बाणाई व धनगरी घोड्याचं अतूट नातं पहावयास मिळेल.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    error: Content is protected !!