Skip to content
Home » जागरण गोंधळ, लंगर तोडणे व घोंगडी

जागरण गोंधळ, लंगर तोडणे व घोंगडी

    आज मितीला महाराष्ट्रात जागरण गोंधळ हि प्रथा माहिती नसलेला माणुस हा शोधुन देखील सापडणार नाही. जागरण गोंधळ या शब्दातच संपुर्ण कुलाचार दडलेला आहे. रात्रभर जागून इथले लोकदैवत असणाऱ्या खंडोबाची आणि घराण्याच्या कुलदैवत असणाऱ्या तुळजाभवानी, अंबाबाई यांची आराधना या पध्दतीत केली जाते.

    जागरण गोंधळ घालण्याची विविध कारणे असतात. लग्न झाल्यावर, कुठल्या मागणीसाठी, नवस पुर्ण झाल्यावर आपापल्या इच्छेनुसार जागरण गोंधळ घातला जातो. यात लग्न झाल्यावर सोळाव्याच्या दिवशी जरी गोडव्याच जागरण घातलं तरी कालांतराने तिखटाचं जागरण गोंधळ घातल जात.

    SK Brothers यांनी बनवलेले सुंदर गीत. लंगर तोडणे हा विधी अगदी व्यवस्थित दाखवला आहे नक्की पहा.

    तिखटाचं म्हणजे खंडोबा आणि देवीला बकऱ्याचा बळी दिला जातो आणि तो नैवेद्द दाखवून जेवणावळी उठल्यावर रात्रभर वाघ्या मुरळीच्या माध्यमातून लोकगीते गाऊन देवांच महात्म्य सांगितलं जातं. यात कुठल्याही स्तोत्रांचा अंतर्भाव नसतो. बोलीभाषेत रचलेली गाणी गाऊन देवाच महात्म्य सांगतात.

    वास्तवात आपण याला लोककला आणि वाघ्या मुरळी याना लोक-कलाकार हि म्हणू शकतो. हि पुजा करताना अंगणात एका पाटावर किंवा चौरंगावर धान्याने विशिष्ट चिन्ह रेखाटून त्यावर चारी बाजूने कडबा उभारून त्याच मखर करतात आणि खंडोबाची मुर्ती ठेवून भंडारा वाहून पान विडा देतात, कोटम भरतात आणि कार्यक्रमाला सुरुवात करतात. 

    कडब्याचे मखर

    यात दिवटी म्हणून पितळी भांड किंवा पूजेच साधन असत. ज्यात सुती कापडाचे बोळे तेलात भिजवून त्यात घालुन पेटवतात. रात्रभर देवाची आराधना झाल्यावर आरती करताना महत्वाची गोष्ट म्हणजे खांद्यावर हातमागावर तयार केलेली जावळ लोकरीची काळी घोंगडी घेतली जाते. आरती झाली की पहाटेच लोखंडी साखळी असते ज्याला लंगर म्हणतात. ती तोडण्याचा कार्यक्रम असतो. तदनंतर हा कार्यक्रम संपवला जातो. यात कडब्याच मखर, जावळाची काळी घोंगडी, लंगर या गोष्टी देव शेती मातीतील आहे. इथल्या परंपरे तील आहे. याची ग्वाही देतात.

    पितळेची दिवटी

    जागरण या कुळातीलच लंगर तोडणे हा एक भाग आहे. कड्यांची मोठी साखळी म्हणजेच लंगर. हि लंगर जावळ लोकरीच्या काळ्या घोंगडीवर ठेवली जाते. काही ठिकाणी लंगर जमिनीवर ठेवली जाते मात्र जावळाच्या घोंगडीला पवित्र मानलं जात म्हणून शक्यतो करून बहुतेकजण लंगर घोंगडीवर ठेवतात व ठेवायलाच पाहिजे.

    लंगर व जावळाची घोंगडी

    वाघ्या जागरणाचा विधी झाल्यावर ही साखळी तोडतो याला लंगर तोडणे असे म्हणतात. वाघ्याने हिसका दिल्यावर तुटलेला लंगर शुभ मानला जातो. लंगर न तुटणे अशुभ मानले जाते. एके काळी एका वाघ्याची थट्टा म्हणून खंडोबाचा निंदक म्हणून असलेला ब्राह्णणाने त्याला तुझा खंडोबा खरा असेल तर तुझ्या एका झटक्यात तेथे पडलेली लोखंडी साखळी तुटेल असे आव्हान दिले.

    लंगर तोडताना

    वाघ्याने एक हिसका देताच ती साखळी तुटली आणि त्या ब्राह्यणाचे कुत्र्यात रूपांतर झाले. ब्राह्यण पत्नी वाघ्यास शरण आली तेंव्हा वाघ्याने भंडारा टाकून पूर्ववत केले. तेंव्हापासून हा लंगर वाघ्या खंडोबाचे शक्तीचे प्रतीक म्हणून तोडू लागला अशी जनश्रुती आहे.

    लंगर तोडताना

    यातील वाघ्या आणि मुरळी हे पुर्वी नवस म्हणुन देवाला सोडले जात. ज्यांच देवाशी लग्न लावलं जात असे. पुढे आयुष्यभर ते अविवाहित राहून देवाची सेवा करत. मात्र सरकारने काही कालावधी मागे या प्रथेवर कायदेशीर बंदी घातली. याबद्दल सरकारचे कौतुक कारण खंडोबाला लोकदेवत मान्यता असूनही असा धाडशी निर्णय घेतल्याबद्दल. 

    2 thoughts on “जागरण गोंधळ, लंगर तोडणे व घोंगडी”

    1. Majhe lagn 2019 madhe 24 disember la jhale
      Jagran ghodal pahathe purn jhalya vr mi nagr todla pan sakli lagen mhanun hata ttun sodli karn Ani upay sagave 8600825180

      1. गडावरील पुजाऱ्याशी संपर्क करा. पश्चिम बाजूच्या दरवाज्याशेजारी भेटतील.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    error: Content is protected !!