संत सद्गुरू बाळूमामा यांच्या मेंढ्या वर्षभर चरण्यासाठी वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये महाराष्ट्रभर फिरत असतात. वर्षातून एकदा या सर्व मेंढ्या बाळूमामाला भेटायला अदमापूरच्या(ता.कागल जि.कोल्हापूर) बाळूमामांच्या समाधी मंदिरी येत असतात. हि भेट म्हणजे माय लेकराची भेट अर्थात सद्गुरु बाळूमामा आपल्या मेंढ्यासहित आदमापुरला पालखीच्या(बगा) रुपाने मरगुबाई मंदिराजवळ येऊन विसावतात. दिपावली पाडवा दिवशी हि भेट होत असते. यावेळी लेंडीपुजन हा सोहळा पार पाडतो. सर्व भक्त मिळून मोठ्या भक्तीभावाने हा सोहळा साजरा करतात आणि भक्तांनी केलेल्या सोहळ्याने सद्गुरु बाळूमामा आनंदून जातात, असे मानले जाते.
संत बाळूमामांच्या मेंढ्यांचा कधी हि बळी दिला जात नाही. अदमापूर हे ठिकाण शाकाहारी आहे. नैसर्गिक रूपाने मेंढ्यांचा मृत्यू झाला कि त्यांचे विधीरूपाने अंत्यसंस्कार केले जाते मात्र या मेंढ्यांची वेळोवेळी लोकर कात्रण केली जाते. हि कात्रण पण एका सोहाळ्याप्रमाणे साजरी केली जाते व यानंतर ती लोकर विकली जाते. संत बाळूमामांच्या मेंढ्याच्या लोकरीपासून जी घोंगडी तयार केली जाते ती “आदमापुरी घोंगडी” म्हणून प्रसिद्ध आहे.
या घोंगडीमध्ये जावळाची घोंगडी किंवा मोठ्या मेंढयाच्या लोकरीची घोंगडी असे सध्या तरी प्रकार पडत नाहीत. दोन्ही प्रकारची लोकर एकत्र करून आदममापुरी घोंगडी तयार केली जाते. शक्यतो हि घोंगडी काळ्या रंगाचीच असते. तसेच कागल तालुक्यातील व आसपासच्या परिसरातील कारागीर इतर मेंढ्याच्या लोकरीपासून जी घोंगडी तयार करतात ती पण आदमापुरी घोंगडी म्हणून ओळखली जाते.
सध्या कारागिरांची संख्या कमी झाल्याकारणाने हातमागावरील या घोंगडीची हि संख्या कमी झालेली आहे. संत बाळूमामांच्या आदमापूर या मुख्य ठिकाणी हि मशीनमेड घोंगडी मोठयाप्रमाणे विकली जाते. घोंगडीबद्दल अधिक माहिती वाचण्यासाठी खालील लिंक ला भेट द्या.